माजी मंत्री विलासराव उंडाळकर यांचे निधन
सातारा - राष्ट्रीय काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मंत्री विलास उंडाळकर पाटील यांचे सातारा येथे निधन झाले. विलासराव उंडाळकर यांनी कराड दक्षिण मतदार संघाचे सलग 35 वर्षे नेतृत्व केले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज पहाटे उपचारादरम्यान वयाच्या 84 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
पुरोगामी विचारांचा नेता म्हणून विलासराव उंडाळकर यांची महाराष्ट्रभर ओळख होती. सलग 35 वर्षे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांनी केले. त्यांच्या या कार्यकाळात त्यांनी अनेक सहकारी संस्थांची उभारणी केली.
12 वर्षे विविध खात्यांचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. सहकार मंत्री म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले होते.
विलासराव उंडाळकर यांनी राज्याच्या सहकार, विधी व न्याय आणि दुग्धविकास विभागाचे मंत्री म्हणून कामकाज पाहिले होते. उंडाळकर यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या कराड तालुक्यातील उंडाळे या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
No comments