क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य ऊर्जा व प्रेरणा देणारे - ना. छगन भुजबळ
क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास अभिवादन करताना मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, आमदार मकरंद पाटील व इतर |
The work of Krantijyoti Savitribai Phule and Mahatma Jyotirao Phule is energizing and inspiring - Chhagan Bhujbal
सातारा दि.3 -: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य ऊर्जा व प्रेरणा देणार असून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. हा महिला शिक्षण दिन संपूर्ण भारतात साजरा व्हावा यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे अन्न अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
स्मारक व चित्रशिल्पाची पहाणी करताना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ |
सुरुवातीला नायगाव ता. खंडाळा येथील क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास श्री. भुजबळ यांनी अभिवादन करुन पुरातत्व विभागाने सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित उभारलेल्या स्मारक व चित्रशिल्पाची पहाणी केली. यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास अभिवादन करताना पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील व इतर |
कार्यक्रमाच्या प्रारंभी सहकार व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, माजी खासदार समीर भुजबळ, खंडाळा पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे यांनीही क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास अभिवादन केले.
फुले दांपत्यानी समाज परिवर्तनाचे मोठे काम केले आहे यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांबरोबर काम करीत आहे. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अखेरच्या श्वासापर्यंत लोकांसाठी काम करीत राहिल्या. त्यांच्या कार्याचाही गौरव ब्रिटीश सरकारने केला. महाराष्ट्र शासनाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात महिला शिक्षण दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम घेऊन फुले दांपत्यांनी केलेल्या कार्याचीही माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार असल्याचेही श्री. भुजबळ यांनी शेवटी सांगितले.
आज प्रत्येक क्षेत्रात महिला काम करीत आहे हे फक्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्ष व त्यागातून शक्य झाले. अनेक अडचणींवर मात व समस्यांना तोंड देवुन त्यांनी आपले काम अखंड सुरु ठेवले. त्यांचा जन्म दिवस आता महिला शिक्षण दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा होणार आहे. आत्ता लागलेल्या शालेय, महाविद्यालयीन निकालांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. फुले दापंत्यांचे काम काम ऊर्जा व प्रेरणा देणार असून महाराष्ट्रातील एकही मुलगी शाळाबाह्य राहणार नाही यासाठी प्रयत्न करु. त्यांचे विचार गाठीशी बांधून कार्य करु असे सांगून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जनतेला शेवटी शुभेच्छा दिल्या.
No comments