Breaking News

श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय फलटण येथील विदयार्थ्यांचे उज्वल यश

The brilliant success of the students of Shrimant Shivaji Raje College of Horticulture and College of Agriculture, Phaltan

        फलटण - फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापिठ, राहुरी मान्यता प्राप्त श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण व कृषि महाविद्यालय,फलटण मधील अंतिम वर्षामधील ०९ विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या पदव्युत्तर पदवी साठी निवड झाली आहे.

        महात्मा फुले कृषि विद्यापिठ अंतर्गत कृषि महाविद्यालय धुळे येथे श्रीमंत शिवाजीराजे हॉर्टीकल्चर कॉलेज मधील बनसोडे करण (फ्रुट सायन्स) व नरुटे अमित (फ्रुट सायन्स) वसंतराव नाईक कृषि विद्यापिठ, परभणी येथे आणि कु.जाधव कल्याणी व कु.सस्ते मेघना यांचे डॉ.बाळासाहेब सावंत कृषि विद्यापिठ, रोहा येथे ( पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट) या विषयास तसेच भोसले शुभम (डेअरी सायन्स) या विषयास डॉ. बाळासाहेब सावंत कृषि विद्यापिठ, दापोली येथे पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली.

        तसेच कृषि महाविद्यालय,फलटण मधील कु.तावरे प्रगती (ॲग्रोनामी) या विषयास महात्मा फुले कृषि विद्यापिठ, राहुरी येथे आणि कु.नाईकरे प्रेरणा (प्लॅण्ट पॅथोलॉजी) डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठ, अंतर्गत कृषि महाविद्यालय, नागपुर येथे तसेच सौरभ कदम याची (प्लॅण्ट पॅथोलॉजी) वसंतराव नाईक कृषि विद्यापिठ, परभणी येथे पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली.

        वरील विद्यार्थ्याच्या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य विधान परीषदेचे सभापती मा.ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निबांळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव व जिल्हा परिषद साताराचे माजी अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी निकम ए.एस. व अधिक्षक फडतरे एस.बी. यांनी वरील विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्राचार्य डॉ.एस.डी. निंबाळकर व प्राध्यापक वृंद यांचे अभिनंदन केले आहे.

No comments