सरपंच पद आरक्षण सोडतीमध्ये अनेक त्रुटी ; पुन्हा सोडत घ्यावी - दशरथ फुले
फलटण (प्रतिनिधी) - फलटण तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींच्या निवडणुक निकालानंतर जिल्हा अधिकारी यांच्या आदेशान्वये तालुक्यातील १३१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदापची जाहिर करण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत अनेक त्रुटी आढळल्याने सदरची सरपंचपद आरक्षण सोडत रद्द करुन, पुन्हा फेर सरपंचपद आरक्षण सोडत काढण्यात यावी अन्यथा चुकीच्या पद्धतीने जाहिर करण्यात आलेल्या आरक्षण सोडतीच्या कृतीविरूध्द मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा माळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिला आहे.
फलटण तालुक्यात ८० ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या मात्र फलटण तहसिलदार यांनी १३१ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडतीव्दारे जाहीर केले ८0 ग्रामपंचायतीऐवजी १३१ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत का काढण्यात आली ? ५१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुर्वी जाहिर का केले ? तर मग ८० ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण निवडणुकीपुर्वी का जाहिर केले नाही ? असे एक ना अनेक प्रश्न फुले यांनी या पत्रकात नमुद केले आहेत.
अनुसुचित जाती प्रवर्गाच्या आरक्षणात १९ सरपंचपदे ( महिला १०, पुरुष ९ ) आरक्षीत करण्यात आली असली तरी १९पैकी १३गांवत या प्रवर्गातील उमेदवारच नाही याच अर्थ असा की केवळ ६ जागेवरच या प्रवर्गाची बोळवण केली असल्याने सरळ सरळ अनुसूचित जाती प्रवर्गावर अन्याय करणारे हे आरक्षण असल्याचे सिद्ध होत आहे शिवाय काही गांवा मध्ये मागिल आरक्षण पुन्हा पडले असल्याचे या आरक्षण सोडतीमध्ये दिसुन येत आहे या ठळक त्रुटीशिवाय अन्य काही त्रुटी आढळुन येत असल्याचे या पत्रकात फुले यांनी निदर्शनास आणुन दिले आहे
फलटण तालुक्यातील निवडणुका झालेल्या ८oग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणुक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे तो त्वरीत रद्द करावा फेरआरक्षण सोडतीनंतर सरपंच उपसरपंच निवडणुक कार्यक्रम जिल्हा अधिकारी यांनी जाहिर करावा अन्य या सर्व बेबनाव कामकाजाविरुध्द आपण हायकोर्ट त याचिका दाखल करणार असल्याचा पुनरउच्चार फुले यांनी या पत्रकात केला आहे.
No comments