Breaking News

राज्यात दिवसभरात १७ हजार ८६४ करोनाबाधित

17 thousand 864 carona affected in a day in the state
        गंधवार्ता वृत्तसेवा दि. 16 मार्च  2021 -  करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असून, मृत्यूंची संख्या देखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून निर्बंध अधिक कडक केले जात आहे. अनेक शहरांमध्ये लॉकडाउन देखील सुरू करण्यात आला आहे. आज दिवसभरात राज्यात ८७ रूग्णांचा मृत्यू झाला असून, १७ हजार ८६४ करोनाबाधित वाढले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२६ टक्के एवढा झाला आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण १,३८,८१३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

        राज्यात आज 17864 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 9510 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2154253 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 138813 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 91.77% झाले असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे. 

        राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे या पार्श्वभूमीवर लसीकरणाला गती देण्यासाठी प्राधान्यक्रमाच्या गटातील सुमारे 1.77 कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून 2.20 कोटी डोस उपलब्ध करून देण्याची मागणी आज केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.

No comments