राज्यात दिवसभरात 40 हजार 414 करोनाबाधित
गंधवार्ता वृत्तसेवा दि. 29 मार्च 2021 - करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असून, मृत्यूंची संख्या देखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून निर्बंध अधिक कडक केले जात आहे. राज्यात आज 40,414 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. आज नवीन 17874 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 2332453 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 325901 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.95% झाले असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे.
No comments