स्वराज साखर कारखान्यात झालेल्या चोरीतील मुद्देमालासह आरोपींना अटक ; फलटण ग्रामीण पोलिसांची कामगिरी
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण - स्वराज इंडिया ऍग्रो लि. च्या लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखाना उपळवे ता. फलटण येथून दि. 8 मार्च रोजी, येथील स्टोअर रूम मधून गण मेटल बुश व ब्रास लायनर जाळ्या असा एकूण 3 लाख 14 हजार 752 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. फलटण ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत, तांत्रिक कौशल्याच्या साह्याने तपास करत गुन्ह्यातील आरोपी व चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला. या कामगिरीबद्दल फलटण ग्रामीण पोलिसांचे अभिनंदन होत आहे.
फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 8 मार्च 2019 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या पूर्वी उपळवे तालुका फलटण येथील स्वराज इंडिया ऍग्रो साखर कारखाना उपळवे येथील कारखान्यातील स्टोअर रूम मधील गण मेटल बुश एकुण 240 किलो त्याची किमत 723 रुपये प्रत्येकी किलो प्रमाणे 1,73,520/- रुपये व ब्रास लाईनर 13 जाळया चे सेट त्याची प्रत्येकी किंमत 10864 रुपये किलो प्रमाणे 1,41,232/- रुपये असे एकूण 3 लाख 14 हजार 752 रुपयांचा मुद्देमाल स्टोअर रूम मधून मालकाच्या संमतीशिवाय चोरून नेला असल्याची फिर्यादी अनिल कुमार पांडुरंग तावरे रा. सांगवी ता. बारामती जि. पुणे यांनी दिली होती.
सदर गुन्हा उघड करण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी सूचना दिलेल्या होत्या, त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यु.एस. शेख यांनी गुन्ह्याचा तपास तांत्रिक कौशल्याने करून व गोपनीय बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी 1) विक्रम गणेश जगदाळे वय 23 वर्षे सावंतवाडा ता. फलटण 2) शशिकांत विष्णू कदम वय 30 वर्षे दऱ्याची वाडी ता. फलटण 3) अक्षय रामचंद्र जाधव वय 23 वर्षे श्रीरामनगर, उपळवे ता. फलटण 4) अमोल अरविंद शिंदे वय 42 वर्षे शिंदेवाडी ता फलटण यांना ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन, प्रश्न कौशल्य वापरून सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता, सदर आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला एकूण 3 लाख 14 हजार 752 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक बोंबले, पोलीस उपनिरीक्षक शेख, पोलीस हवालदार हांगे, पोलीस नाईक तुपे, पोलीस कॉन्स्टेबल जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल अवघडे, पोलीस कॉन्स्टेबल कुंभार, पोलीस नाईक देवकर, पोलीस नाईक काशीद, पोलीस कॉन्स्टेबल पाटोळे व पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड यांनी केली आहे.
No comments