मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थ असलेली चारचाकी सापडल्याच्या प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे
मुंबई (अर्थसंकल्पीय अधिवेशन) -: मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थांसह सापडलेल्या गाडीच्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात येत असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केली.
तत्पूर्वी गृहमंत्री श्री.देशमुख म्हणाले, मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थ सापडलेली स्कॉर्पिओ गाडी मनसुख हिरेन यांच्या ताब्यात होती. ही गाडी सॅम पीटर न्यूटन यांच्या मालकीची होती. श्री.हिरेन यांचे गॅरेज आहे. गाडीच्या अंतर्गत सजावटीसाठीचे (इंटिरिअर) गॅरेजचे पैसे मूळ मालकाने दिले नाही म्हणून त्यांची गाडी मनसुख हिरेन यांच्या ताब्यात होती. आज रेतीबंदर या ठिकणी श्री. हिरेन यांचा मृतदेह सापडला. अंगावर कोणत्याही खुणा नाहीत. ठाणे पोलिस त्याची चौकशी करत आहेत. शवविच्छेदन अहवालात सर्व बाबी स्पष्ट होतील. महाराष्ट्र पोलीस, मुंबई तसेच ठाणे पोलीस या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी सक्षम आहेत, असेही श्री. देशमुख म्हणाले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने शिफारस करावी, अशी मागणी विधानसभेत केली.
त्यानंतर या प्रकरणाचा तपास ‘एटीएस’कडून करण्यात येईल असे निवेदन गृहमंत्री श्री.देशमुख यांनी सभागृहात केले.
No comments