Breaking News

मुद्रांक शुल्क भरलेल्या दस्त नोंदणीचा कालावधी चार महिने असल्याने कार्यालयात गर्दी न करण्याचे आवाहन

Appeal not to rush to the office as the period of registration of documents paid stamp duty is four months

         सातारा  (जिमाका):स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांतरण किंवा विक्रीपत्राच्या दस्तऐवजांवर शासनाने 31 मार्च 2021 पर्यंत सवलत जाहीर केली असल्याने या संधीचा लाभ घेण्याकरिता सातारा जिल्ह्यातील एकूण 15 दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे. तथापी मुद्रांक शुल्क भरलेले उक्त दस्तऐवज नोंदणी अधिनियमानुसार दस्त निष्पादीत केलेल्या दिनांकापासून चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी सादर करता येतात, त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी करु नये, असे आवाहन  सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी बी.के. खांडेकर यांनी केले आहे.

                महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन मुंबई यांचे 29 ऑगस्ट 2020 रोजीच्या शासन राजपत्रानुसार कोणत्याती स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या तसेच 29 वर्षापेक्षा जास्त कालावधीचे भाडेपट्टा या दस्तऐवजांवर उक्त अधिनियमास जोडलेल्या 1 च्या अनुच्छेद 25 च्या खंड (बी) व 36 (iv) अन्वये अधिभारासह आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क 1 सप्टेंबर 2020 पासून सुरु होणाऱ्या आणि दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी संपणाऱ्या कालावधीकरिता तीन टक्के तर दिनांक 1 जानेवारी 2021 पासून सुरु होणाऱ्या 31 मार्च 2021 रोजी संपणाऱ्या कालावधीत दोन टक्के कमी केले आहे, असेही मुद्रांक जिल्हाधिकारी बी.के. खांडेकर यांनी कळविले आहे.

No comments