सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझेंना 10 दिवसांची कोठडी
मुंबईतील अँटीलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयए(NIA)च्या विशेष न्यायालयाने 10 दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. एनआयच्या वकिलांनी वाझेंची 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. दरम्यान, शनिवारी 13 तासांच्या चौकशीनंतर एनआयएने सचिन वाझेंना अटक केली होती.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या गाडी प्रकरणी शनिवारी 13 तास सचिन वाझेंची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर रात्री उशिरा अटक करण्यात आली. आज सकाळी सचिन वाझेंना कोर्टात हजर करण्यात आले होते. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सचिन वाझे यांना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे
No comments