Breaking News

तहसीलदार पथकास हुलकावणी देऊन अवैध माती वाहतूक डंपर पसार ; तिघांवर गुन्हा दाखल

Crime record against three persons transporting soil

     फलटण (प्रतिनिधी) - : फलटण पुर्व भागातील निंबळक टाकळवाडा रस्त्यावर बेकायदेशीरपणे माती वाहतूक करणाऱ्या डंपरला तहसिलदारांच्या पथकाने थांबण्याचा इशारा देवूनही त्यांना हुलकावणी देत पळून गेल्या प्रकरणी तीघांविरोधात फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

       याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, मंगळवार दि. १६ मार्च रोजी रात्री साडेबारा ते पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास निंबळक व टाकळवाडा गावच्या हद्दीतील रस्त्यावर डंपर क्रमांक एम एच १३ एएक्स ३९८४ हा माती भरून जात असताना मिळून आला. सदर डंपरला तहसीलदार यांच्या पथकाने थांबवण्याचा प्रयत्न केला असता डंपरचा चालक पप्पू रजपुत (पूर्ण नाव माहीत नाही) रा. जावली ता. फलटण याने डंपर चालू स्थितीतच रस्त्याने खाली करत सदरचे वाहन मुळीक वस्ती येथे लावले व तो पळून गेला. तसेच हा डंपर कुणाल झगडे याच्याकडून चालवण्यास घेतला असल्याचे समीर दिनकर गावडे रा. टाकळवाडा ता. फलटण याने सांगितले. त्यानुसार कुणाल झगडे (पूर्ण नाव माहीत नाही) रा. कटफळ ता. बारामती हे सदरचा डंपर निंबळक फाटा येथून बरडच्या दिशेने घेऊन जात असताना तहसील पथकाने थांबवण्याचा इशारा करूनही त्यांना हुलकावणी देऊन पंढरपूर रोडने पळून गेला, याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये पप्पू रजपूत, समीर दिनकर गावडे व कुणाल झगडे यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

No comments