Breaking News

फलटण शहर व तालुक्यातील नागरिकांनी भारत बंद मध्ये सहभागी व्हावे- श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

Citizens of Phaltan city and taluka should participate in Bharat Band - Shrimant Sanjeevraje Naik Nimbalkar

        फलटण( प्रतिनिधी ) किसान मोर्चा ने पुकारलेल्या शुक्रवार  दि. 26 मार्च 2021 रोजीच्या भारत बंद ला  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला असून फलटण शहर व तालुक्यातील सर्व व्यवसायिक, छोटे मोठे व्यापारी, भाजी मंडई, किराणा यांनी या बंदमध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

        बंद ठेवण्या बाबतची नियोजन बैठक लक्ष्मी विलास पॅलेस, फलटण येथे आयोजित करण्यात आली होती . यावेळी श्रीमंत संजीवराजे बोलत होते. या बैठकीस आमदार दिपकराव चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे, महानंदा चे उपाध्यक्ष डि.के.पवार, जेष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे सदस्य श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता अनपट, फलटण नगर पटिषदेचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईट,फलटण नगटपटिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

        पुढे बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की ,   माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली देशभर कार्यरत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने किसान मोर्चा या बॅनरखाली शुक्रवार दि.२६ मार्च रोजी आयोजित "भारत बंद" मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.केंद्रातील भाजपच्या सरकारने सार्वजनिक संपत्तीची विक्री करणारे जनविरोधी निर्णय घेतलेले आहेत, इंधन व गॅस सिलेंडरच्या प्रचंड दरवाढीच्या विरोधात ही बंदची हाक देण्यात आली आहे.

        महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे नेतृत्वाखाली आ.दिपकराव चव्हाण साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण- कोरेगाव विधानसभा मतदार संघात भारत बंद यशस्वी करण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले असल्याचे सांगतानाच संयुक्त किसान मोर्चा या बॅनर खाली देशातील ५०० पेक्षा जास्त संघटना एकत्र येऊन दिल्लीच्या सीमेवर शेतकरी बांधव शांततामय मार्गाने केंद्र सरकारने केलेले काळे कायदे रद्द करणेबाबत आंदोलन करीत आहेत. आतापर्यंत या आंदोलनात ३०० हुन अधिक शेतकऱ्यांचे बळी गेलेले असल्याचेही श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले. 

        यावेळी महादेवराव पवार, प्रा.भिमदेव बुरुंगले नगरसेवक अजय माळवे दादासाहेब चोरमले, भाऊसाहेब कापसे, किशोरसिंह नाईक निंबाळकर, राहूल निंबाळकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस सर्व सेलचे पदाधिकारी, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांनी वेळेत उपस्थित होते.

No comments