Breaking News

‘सारथी’ला पुण्यात शिवाजीनगर येथे जागा देण्यास मान्यता

 मंत्रिमंडळ निर्णय

Cabinet decision - Approval to give place to ‘Sarathi’ at Shivajinagar in Pune

        मंत्रिमंडळ निर्णय : दि. 24 मार्च 2021 -  छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेस पुण्यातील शिवाजीनगर येथील जागा उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

        शिवाजीनगर पुणे येथील (नगर भूमापन क्र.173 ब/1 मधील जागेपैकी)  आगरकर रस्त्यावरील शालेय शिक्षण विभागाची 4 हजार 163 चौ.मी. इतकी जागा सारथीला देण्यात येणार आहे. या ठिकाणी सारथीचे कार्यालय, अभ्यागत कक्ष, अभ्यास केंद्र, ग्रंथालय, अभ्यासिका, कॉन्फरन्स हॉल इ. सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. शासकीय जागा वाटपाबाबतच्या नियमित अटी व शर्तींच्या अधीन राहून महसूलमुक्त व भोगवटामूल्यरहित किंमतीने ही जागा देण्यात देण्यात येणार आहे.

No comments