महाशिवरात्री उत्सव साधेपणाने साजरा करा - जिल्हाधिकारी शेखर सिंह
सातारा दि.10 (जिमाका): सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने दि. 11 मार्च रोजी होणारा महाशिवरात्री उत्सव अत्यंत साधेपणाने व शासनाने वेळोवेळी दिलेल्या नियमांचे तसेच सामाजिक अंतराचे पालन करुन साजरा करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी संहिता, 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त असलेल्या अधिकारान्वये दि. 11 मार्च रोजी 0.00 वा. पासून ते 24.00 वा. पर्यंत पुढील आदेश जारी केले आहेत.
कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाशिवरात्री उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा. त्या अनुषंगाने सर्व मंदिर विश्वस्त, व्यवस्थापक यांनी मंदिरात देवदर्शनासाठी गर्दी होणार नाही व सामाजिक अंतराचे पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. भाविकांनी घराबहेर न पडता शक्यतो घरात राहूनच पूजाअर्चा करावी. प्रत्येक शिवमंदिराच्या आतील बाजूस सामाजिक अंतराचे पालन होण्याच्या दृष्टीने एकावेळी फक्त 20 भाविक दर्शन घेतील. मंदिराच्या परिसरात हार व फुले विक्रेते यांची गर्दी होणार नाही तसेच सामाजिक अतराच्या नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे मंदिराच्या व्यवस्थपकांनी लक्ष द्यावे. प्रत्यक्ष मंदिरात येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी स्वत:हून मास्कचा वापर व सामाजिक अंतराचे पालन करावो. जेष्ठ नागरिक व लहान मुलांना मंदिरात दर्शनाकरिता आणू नये. मंदिर व्यवस्थापनाने आजूबाजूच्या परिसरात निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करावी. महाश्विरात्री निमित्त शिवमंदिरातील व्यवस्थापक यांनी दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, बेवसाईट व फेसबुक इत्यादी द्वारे उपलब्ध करुन द्यावी.
वरील आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधिीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास त्यांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद केले आहे.
No comments