फलटण शहरात 4 ठिकाणी व तालुक्यात 6 ठिकाणी कंटेंटमेंट झोन
जाधववाडी कंटेनमेंट झोन |
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण - : फलटण शहर व तालुक्यात वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ज्या भागात/गावात अधिक कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत अशा ६ गावे आणि फलटण शहरातील ४ ठिकाणी मायक्रो कंटेनमेंट झोन (सूक्ष्म प्रतिबंधीत क्षेत्र ) व बफर झोन जाहीर करण्यात आले आहेत. संबंधित कंटेनमेंट झोनमध्ये रिक्षा व अनाउन्समेंट च्या सहाय्याने नागरिकांना कंटेनमेंट बाबत सूचना दिल्या असून, जाधववाडी व कोळकी कंटेनमेंट झोनमध्ये नागरिकांचे चांगले सहकार्य लाभत असून या भागातील सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.
शहरातील लक्ष्मीनगर ते डी. एड. चौक परिसरात १०, महाराजा मंगल कार्यालय परिसरात १७, उमाजी नाईक चौक परिसरात ५, काळूबाईनगर परिसर, मलठण येथे ६ बाधीत रुग्ण आढळल्याने या ४ ठिकाणी कंटेनमेंट व त्या भागात बफर झोन तसेच तालुक्यातील वाठार निंबाळकर येथे १०, जोरगाव येथे ५, झिरपवाडी येथे ६, जाधववाडी येथे २९, कोळकी येथे ४० आणि साखरवाडी येथे ७ बाधीत रुग्ण आढळल्याने सदर ६ गावातील गावठाण परिसर मायक्रो कंटेनमेंट झोन (सुक्ष्म प्रतिबंधीत क्षेत्र) आणि संपूर्ण गाव बफर झोन घोषीत करण्यात आले आहेत.
No comments