Breaking News

कोरोना धोका वाढला! फलटण तालुक्यात 39 पॉझिटिव्ह

Corona virus phaltan updates : 39 corona positive 

        गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 10 मार्च  2021 - जिल्हा प्रशासनाकडून आज 10 मार्च 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 39 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.  यामध्ये शहरात 17 व्यक्ती तर ग्रामीण भागात 22 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान फलटण तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, दुसऱ्या लाटेत प्रथमच 39 रुग्ण सापडले आहेत. यामुळे कोरोनाचा धोका वाढलेला आहे. नागरिकांनी कंपल्सरी मास्क वापरावे  व सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. 

फलटण शहरात 17 कोरोना पॉझिटिव्ह

 यामध्ये  फलटण 4, स्वामी विवेकानंदनगर 1, कसबा पेठ 8, लक्ष्मीनगर 3, मलटण 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. आहेत.

ग्रामीण भागात 22 कोरोना पॉझिटिव्ह 

 यामध्ये  खुंटे  1, पिंप्रद 1, तरडगाव 4, मुंजवाडी 1, कोळकी 5, शिंदेवाडी 5, सांगवी 1, जिंती 1, बरड 1,  गिरवी 1, ठाकुरकी 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.



No comments