Breaking News

चिंताजनक! फलटण तालुक्यात आकडा वाढला ; 90 कोरोना पॉझिटिव्ह

Corona virus phaltan updates : 90 corona positive  

        गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 25 मार्च  2021 - जिल्हा प्रशासनाकडून आज 25 मार्च 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 90 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.  यामध्ये शहरात 31 व्यक्ती तर ग्रामीण भागात 59 रुग्ण सापडले आहेत. , दुसऱ्या लाटेत आज प्रथमच 90 रुग्ण सापडले आहेत. यामुळे कोरोनाचा धोका वाढला असून ही बाब चिंताजनक आहे.  नागरिकांनी कंपल्सरी मास्क वापरावे  व सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे.

फलटण शहरात 31 कोरोना पॉझिटिव्ह

 यामध्ये  फलटण 6,  कसबा पेठ 3, रविवार पेठ 7, मेटकरी गल्ली 2, बुधवार पेठ 2, रंगारी मंदिर 1, आनंद नगर 2, लक्ष्मीनगर 5, मलठण 1, संत बापुदास नगर 2 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. आहेत.

ग्रामीण भागात 59 कोरोना पॉझिटिव्ह 

 यामध्ये राजाळे 5, सांगवी 13, सस्तेवाडी 3, आदर्शनगर 1, कोळकी 3,   शाहुनगर 1,  गुणवरे 2, पिंप्रद 3, तरडगाव 2,  सोमेश्वर 1, कांबळेश्वर 2, मठाचीवाडी 1, धुळदेव 2, शारदानगर कोळकी 1, नरसोबानगर कोळकी 1, पाडेगाव 1, संजय गांधी नगर 1, भुजबळ मळा 1, दुधेबावी 1, बिरदेव नगर 2, साठेफाटा 1, हणुमंतवाडी 1,  सरडे 1, विडणी 1, निंबळक 2, सोमंथळी 1, गोखळी 1, हिंगणगाव 1, फडतरवाडी 1, बोडकेवाडी 1, साखरवाडी 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

No comments