फलटण तालुक्यात 39 कोरोना पॉझिटिव्ह तर 1 बधिताचा मृत्यू
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 24 मार्च 2021 - जिल्हा प्रशासनाकडून आज 24 मार्च 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 39 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 24 व्यक्ती तर ग्रामीण भागात 15 रुग्ण सापडले आहेत तर 1 बधिताचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
फलटण शहरात 24 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये फलटण 3, उमाजी नाईक चौक 1, शुक्रवार पेठ 1, दत्तनगर 1, सोमवार पेठ 1, रविवार पेठ 4, लक्ष्मीनगर 4, संजीवराजे नगर 2, नारळी बाग 1, गिरवी नाका 3, मारवाड पेठ 1,गजानन चौक 1, पुजारी कॉलनी 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. आहेत.
ग्रामीण भागात 15 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये तरडगाव 1, वाखरी 1, जाधववाडी 2, विंचूर्णी 1, सोनवडी खुर्द 1, आसु 1, हणमंतवाडी 1, उपळवे 1, कोळकी 1, तावडी 2, वडगाव 1, बिरदेवनगर 1, धावली 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
एका बधिताचा मृत्यू
राजुरी ता. फलटण येथील 55 वर्षीय पुरुष या कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
No comments