तरडगाव कोरोना हॉटस्पॉट ;फलटण तालुक्यात 30 पॉझिटिव्ह
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 15 मार्च 2021 - जिल्हा प्रशासनाकडून आज 15 मार्च 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 30 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 5 व्यक्ती तर ग्रामीण भागात 25 रुग्ण सापडले आहेत. तर तालुक्यात तरडगाव हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. या ठिकाणी एकाच वेळी 12 बाधित रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
फलटण शहरात 5 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये फलटण 1, मलठण 1, लक्ष्मीनगर 2, भडकमकरनगर 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. आहेत.
ग्रामीण भागात 25 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये तरडगाव 12, वनदेवशेरी कोळकी 1, सजाई गार्डन जाधववाडी 1, सांगवी 2, वडणी 2, वाठार निंबाळकर 1, गुणवरे 1, कोळकी 1, नांदल 1, खुंटे 1, भाडळी 1, पाडेगाव 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
No comments