Breaking News

चिंताजनक! फलटण तालुक्यात 89 कोरोना रुग्ण ; तरडगाव 18, सांगवी 11 तर शहरात 23

Corona virus Phaltan updates :  89 corona positive

        गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 17 मार्च  2021 - जिल्हा प्रशासनाकडून आज 17 मार्च 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 89 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.  यामध्ये शहरात 23 व्यक्ती तर ग्रामीण भागात 66 रुग्ण सापडले आहेत. तर तालुक्यात तरडगाव येथे सलग तिसऱ्या दिवशीही संख्या वाढली आहे. या ठिकाणी  एकाच आज वेळी 18 बाधित रुग्ण सापडले आहेत. तसेच सांगवी येथेही 11 हृन सापडले आहेत. दरम्यान फलटण तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, दुसऱ्या लाटेत आज प्रथमच 89 रुग्ण सापडले आहेत. यामुळे कोरोनाचा धोका वाढला असून ही बाब चिंताजनक आहे. या पार्श्‍वभूमीवर फलटणचा आठवडी बाजार ही रद्द करण्यात आला आहे. नागरिकांनी कंपल्सरी मास्क वापरावे  व सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. 

फलटण शहरात 23 कोरोना पॉझिटिव्ह

     यामध्ये  फलटण 11, नारळी बाग 1,लक्ष्मीनगर 5, सगुणा माता नगर 1 ,मलटण 1,  भडकमकरनगर 3, विद्यानगर 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. आहेत.

ग्रामीण भागात 66 कोरोना पॉझिटिव्ह 

     यामध्ये आदर्की बु 1,  साखरवाडी 1, साटेफाटा 1, विडणी 3, निंभोरे 3, पाडेगाव 2, आसू 1, पवारवाडी 1,  टाकुबाईचीवाडी 1,    शिंदेवाडी 2,  सस्तेवाडी 1, कोळकी 4, मटाचीवाडी 1, फडतरवाडी 1, तरडगाव 18, माळेवाडी 4, सांगवी 11, निंबळक 2,कांबळेश्वर 5, सरडे 2, गुणवरे 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

No comments