चिंताजनक! फलटण तालुक्यात 94 कोरोना पॉझिटिव्ह ; शहर व ग्रामीण प्रत्येकी 47 रुग्ण
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 26 मार्च 2021 - जिल्हा प्रशासनाकडून आज 26 मार्च 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 94 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 47 व्यक्ती तर ग्रामीण भागात 47 रुग्ण सापडले आहेत. , दुसऱ्या लाटेत आज प्रथमच 94 रुग्ण सापडले आहेत. यामुळे कोरोनाचा धोका वाढला असून ही बाब चिंताजनक आहे.
फलटण शहरात 47 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये फलटण तालुक्यातील फलटण 5, शुक्रवार पेठ 3, रविवार पेठ 2, लक्ष्मीनगर 10, बुधवार पेठ 1, विद्यानगर 1, बुरुड गल्ली 1, संजीवराजे नगर 1, उमाजी नाईक चौक 1, खाटीक गल्ली 1, भडकमकरनगर 1, गोळीबार मैदान 2, जिंती रोड 1, सगुणामाता नगर 6, कसबा पेठ 4, मलठण 4, दत्तनगर 1, गिरवी नाका 2 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. आहेत.
ग्रामीण भागात 47 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये शिंदेवाडी 2, जाधववाडी 1, कोळकी 8, आदर्की 1, पिराचीवाडी 1, कुरवली 2, वाठार निंबाळकर 2, धुमाळवाडी 1, मुरुम 2, साखरवाडी 1, खुंटे 2, वाखरी 1, नवा मळा ठाकुरकी 2, मिरेवाडी 1, सोनवडी 1, विडणी 1, गुणवरे 1, घाडगेवाडी 1, पिंपळवाडी 3, वडले 1, फडतरवाडी 1, आंदरुड 1, गोखळी 2, काळज 1, चौधरवाडी 2, भाडळी खु 1, गिरवी 2, निरगुडी 1, सुरवडी 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
No comments