1 एप्रिलपासून 45 वर्षावरील सर्वं नागरिकांना कोविड लसीकरण
लसीकरण केंद्रास सकाळी 10 ते सायं 5 पर्यंत भेट देवून लसीकरणाचा लाभ घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन
सातारा (जिमाका): केंद्र व राज्य शासनाच्या सुचनेनुसार सातारा जिल्हयातील कोविड-19 अंतर्गत लसीकरण कार्यक्रम सुरु असून यातंर्गत सातारा जिल्हयातील सर्व हेल्थ् केअर वर्कर व फ्रंट लाईन वर्कर यांचे कोविड लसीकरण करण्यात आले आहे. शासनाच्या नवीन निर्णयानुसार 1 एप्रिलपासून सातारा जिल्हयातही 45 वर्षावरील सर्व लोकांना कोविड - 19चे मोफत लसीकरण सुरु करणेत येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये यांनी दिली.
सातारा जिल्हयात 45 वर्षावरील सर्व लोकांना कोविड लसीकरणाचा लाभ मिळण्याकरीता नागरिकांनी https://selfregistration.cowin.gov.in या लिंक चा वापर करुन आपले नावाची नोंदणी करावी. ज्या व्यक्तींना Online नोंदणी करता येणार नाही त्यांनी आपले आधार कार्ड घेऊन लसीकरण केंद्राचे ठिकाणी सकाळी 10 ते सायं 5 या वेळेत भेट देवुन नोंदणी करुन लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.
सद्यस्थितीत सातारा जिल्हयातील सर्व शासकिय रुग्णालय (सामान्य रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालय व 65 प्राथमिक आरोग्य केंद्र असे 79 शासकिय व 10 खाजगी ठिकाणी कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. या मध्ये सातारा जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय कराड व फलटण, ग्रामीण रुग्णालय मेढा, महाबळेश्वर, खंडाळा, दहिवडी, वडूज, कोरेगांव, ढेबेवाडी. पाटण, मिशन हॉस्पीटल वाई तसेच जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र (यापैकी ठोसेघर ता सातारा, येवती ता कराड, केरळ, मुरुड, सळवे, सणबुर, सोनवडे, ता. पाटण ही ठिकाणे वगळून) व तसेच नागरी आरोग्य केंद्र गोडोली, कस्तूर्बा ता. सातारा व कराड या शासकिय रुग्णालयांमध्ये सकाळी 10 ते सायं 5 या वेळेत कोविड-19 चे लसिकरण मोफत देण्यात येणार आहे. तसेच नोंदणीकृत खाजगी आरोग्य संस्था अॅन्को लाईफ सेंटर तामजाईनगर, संजीवन हॉस्पीटल सातारा, कृष्णा हॉस्पीटल कराड, सह्याद्री हॉस्पीटल कराड, शारदा हॉस्पीटल कराड, गुजर मेमोरियल हॉस्पीटल कराड, मानसी मेमोरियल हॉस्पीटल खंडाळा, पाटील हॉस्पीटल कोरेगांव, मंगलमुर्ती क्लिनिक सातारा, घोटवडेकर हॉस्पीटल वाई या ठिकाणी रुपये 250/- प्रती डोस शुल्क घेऊन लस देणेत येणार आहे.
No comments