कोरोना चाचणी सेंटरवर चाचणी करण्यासाठी व्यवसायिक - दुकानदारांची गर्दी
कोव्हीड चाचणीसाठी दुकानदार आणि व्यवसायिक यांनी केलेली गर्दी (छाया- बाळकृष्ण भगत) |
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण - प्रशासनाने दि. 21 मार्च पर्यंत दुकानदार आणि व्यवसायिक यांनी कोव्हीड चाचणी करणे अनिवार्य केले असल्यामुळे, शहरातील कोरोना चाचणी सेंटरवर गर्दी होताना दिसत आहे. या ठिकाणी सोशल डिस्टंसिंग चे कोणतेही पालन होताना दिसत नाही. प्रशासनाने इथे सोशल डिस्टंसिंग चे पालन कसे होईल याकडे लक्ष द्यावे. तसेच कोरोना चाचणी करून घेण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदत वाढवावी अशी व्यावसायिक व दुकानदारांची मागणी आहे.
कोरोना चाचणी सेंटरवर गर्दीच्या ठिकाणी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांची चांगलीच धावपळ होताना दिसते आहे. काही नागरिकांच्या तोंडाला मास्क आहे. परंतु काहींच्या तोंडा खाली मास्क दिसत आहे. आंतर ठेवण्यासाठी तेथील कर्मचारी नागरिकांना सांगत आहेत. पण गर्दीत अधिकच भर पडत असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सांगण्याकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे सोशल डिस्टनसिंगचेही पालन होत नाहीये. अशा गर्दीमुळे कोरोना वाढण्याची अधिक शक्यता आहे.
त्यामुळे आता कोरोना चाचणी सेंटरवर होणारी गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना आखणे गरजेचे झाले आहे. एकतर कोरोना चाचणी सेंटर वाढवावीत तसेच तेथे सोशल डिस्टनसिंग चे पालन करून क्रमाक्रमाने चाचणी करण्याची सोय करण्यात यावी किंवा कोरोना चाचणी करून घेण्याची मुदत तरी वाढवावी अशी व्यवसायिक व दुकानदारांच्या चर्चा सुरू आहे.
No comments