Breaking News

यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेच्या पूर्वप्रशिक्षणासाठी अर्ज करण्यासाठी ११ मार्चपर्यंत मुदत

Deadline for application for pre-training of UPSC Civil Service Examination is 11th March

        मुंबई  - : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या वतीने (एसआयएसी) संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२१ साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणास प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून प्रवेश परीक्षेचा अर्ज ऑनलाइन भरण्यास दि. 11 मार्च, 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

        ‘एसआयएसी’च्या मुंबई, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, व कोल्हापूर केंद्रातून हे प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी इच्छुक पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. दिनांक ७ मार्च, २०२१ ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक 11 मार्च, 2021 राजी सायं. ५.०० वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. सविस्तर जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम, पात्रता, ऑनलाइन अर्ज भरण्याविषयी सूचना आदी माहिती http://www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments