ड्रायव्हरनेच नेला टँकर चोरून
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण - निंभोरे ता. फलटण येथील मॅक पेट्रोलियम या पेट्रोल पंपदावरून मल्लिकार्जुन ट्रान्सपोर्ट कंपनीचा 19 लाख रुपये किमतीचा टॅंकर ड्रायव्हरने परस्पर चोरून नेला आहे. फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला याबाबत ड्रायव्हर वर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 23 मार्च 2021 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मल्लिकार्जुन ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकीचा टँकर नंबर एम एच 20 ईजी 4153 हा 19 लाख रुपये किंमतीचा टँकर, स्वतः टँकर ड्रायव्हर महेश गोपीनाथ वाघमारे वय 32 वर्षे रा. कण्हेरगाव ता.माढा जि.सोलापुर याने कंपनीच्या संमतीशिवाय मुददाम लबाडीने चोरुन नेला असल्याची फिर्याद मल्लिकार्जुन ट्रान्सपोर्ट कंपनीचे मॅनेजर रामेश्वर महादेव पारीसकर रा. नवले पुलाजवळ न-हे, पुणे यांनी दिली आहे.
अधिक तपास पोलीस निरीक्षक एन. टी. सावंत करीत आहेत.
No comments