सासकल येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर गुन्हा दाखल
फलटण (प्रतिनिधी) -: तालुक्यातील सासकल येथील ओढयामध्ये अवैधपणे वाळू उपसा करणाऱ्या एक जणांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एक लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोपट मल्हारी खोमणे वय २९ रा. सासकल ता. फलटण असे गुन्हा नोंद झालेल्या संशयिताचे नाव आहे.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी कि, गुरुवार दि. १८ मार्च रोजी रात्री पावणे एकच्या सुमारास सासकल येथील ओढयामध्ये पोपट मल्हारी खोमणे हा अवैधरीत्या बिगर परवाना वाहतूक करत असताना मिळून आला. या घटनेत पोलिसांनी एक लाख रुपये किमतीचा अस्पष्ट पासिंग नंबर असलेला टॅक्टर, ५० हजार रुपये किमतीची पासिंग नंबर नसलेली ट्रॉली व सहा रुपये किमतीची ट्रॉली मध्ये भरलेली एक ब्रास वाळू असा एकूण एक लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थळावरुन जप्त केलेला आहे. या प्रकरणी पोपट मल्हारी खोमणे याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार पी. ए. खाडे करीत आहेत.
No comments