Breaking News

अनमोलरत्न ॲम्बुलन्स सर्विस च्या टायर खरेदीसाठी प्रशांत अहिवळे यांच्याकडून आर्थिक मदत

Financial assistance from Prashant Ahiwale for purchase of Anmolratna Ambulance Service tires

        गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण - बु. गणेश अहिवळे यांच्या सामाजिक बांधिलकीचा वारसा जतन करत त्यांचे बंधू राष्ट्रवादी काँग्रेस (राजे गटा)चे कट्टर समर्थक प्रशांत अहिवळे यांनी, गोरगरीब रुग्णांची माफक दरात व निराधार रुग्णांसाठी मोफत सेवा बजावत असणाऱ्या अनमोल रत्न ॲम्बुलन्स सर्विस च्या टायर खरेदी साठी दहा हजार रुपये आर्थिक मदत केली. सदरचा धनादेश श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते अमोल रोमण यांच्याकडे प्रदान करण्यात आला.

        श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने श्री अमोल रोमन हे अनमोल रत्न ॲम्बुलन्स सर्विसच्या माध्यमातून शहरातील गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी माफक दरात व निराधार रुग्णांसाठी मोफत सेवा बजावत आहेत, त्यांच्या या उदात्त धोरणाने प्रेरित होऊन आपणही समाजाचे देणे लागतो या उद्देशाने प्रशांत  अहिवळे यांनी ॲम्बुलन्स च्या टायर खरेदीसाठी 10 हजार रुपयांची आर्थिक मदत केली.

        आर्थिक मदतीचा धनादेश दिल्यानंतर प्रशांत अहिवळे यांचा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. राजवैद्य, रहीम तांबोळी, अमोल रोमन, धीरज आग्रवाल, तुषार इंगळे, असीम तांबोळी उपस्थित होते.

No comments