Breaking News

सरडे येथे हरभरा शेतीदिन कार्यक्रम संपन्न

किटकशास्त्रज्ञ डॉ पाडुरंग मोहिते  मार्गदर्शन करताना

     फलटण -  सरडे ता फलटण येथे कृषि विभागा मार्फत रब्बी हंगाम हरभरा शेतीदिन व प्रक्षेत्र भेट व विविध औजाराचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. यावेळी कीटक शास्त्रज्ञ कृषि महाविद्यालय कोल्हापूर विभाग कोल्हापूर डॉ पाडुरंग मोहिते , उपविभागीय कृषी अधिकारी फलटण भास्करराव कोळेकर, तालुका कृषि अधिकारी फलटण सुहास रणसिंग , वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री दत्तात्रय ननावरे, शास्त्रज्ञ  डॉ. व्ही. डी. सुर्वे , कृषि पर्यवेक्षक  मल्हारी नाळे , संचालक श्रीराम सहकारी साखर कारखाना फलटण, कांतीलाल बेलदार  माजी संचालक श्रीराम सहकारी साखर कारखाना फलटण, सुखदेव बेलदार, संदीप रोखडे क्षेत्र अधिकारी इफको,  भारती मशनरी चे  सचिन जानकर ,कृषी सहाय्यक राजाळे श्री सचिन जाधव व शेतीशाळा मध्ये सहभागी शेतकरी व सरडे पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित उपस्थित होते.

   यावेळी हरभरा पीक प्लॉट  प्रक्षेत्र भेट देण्यात आली व मा उपविभागीय कृषि अधिकारी फलटण यांनी कृषि विभागा मार्फत राबविण्यात येणारी विविध योजनेबाबत  व शेतीपूरक व्यवसाय बाबत  व त्याच्या माध्यमातून प्रगती करण्याबाबत शेतकऱ्यांना  मार्गदर्शन केले  व शेतीशाळेमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे  अभिनंदन केले.

    सचिन जानकर यांनी विविध औजार बाबत  व मशनरी बाबत माहिती दिली तसेच  प्रगतशील शेतकरयांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

    यावेळी कीटक शास्त्रज्ञ कृषि महाविद्यालय कोल्हापूर विभाग कोल्हापूर डॉ पाडुरंग मोहिते ,यांनी विविध रोग व किडींन बाबत तसेच हुमणी कीड भुंगे नियंत्रण बाबत व हरभरा डाळ प्रक्रिया संबंधी  सविस्तरपणे मार्गदर्शन  डॉ. पाडुरंग मोहिते यांनी केले.                 

      यावेळी शेतीशाळा वर्गा मध्ये घेण्यात आलेल्या विविध  विषयावरून शेतकऱ्यांना प्रश्न विचारण्यात आले श्री सुनील भोरे , दत्तात्रय वाघमोडे, चंद्रकांत शेडगे, गोपीनाथ वाघमोडे  यांनी उत्तरे दिली. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करणयात आला.  सूत्रसंचालन  व आभार श्री सचिन जाधव यांनी केले.

No comments