Breaking News

21 मार्च पर्यंत दुकानदार व व्यवसायिकांनी कोव्हीड चाचणी न केल्यास दुकाने - व्यवसाय बंद - डॉ. शिवाजीराव जगताप

If shopkeepers and traders do not test the covid till March 21 then shops will be closed -Shivajirao Jagtap

        गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 18 मार्च 2021 -  फलटण तालुक्यामध्ये कोविड रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व दुकानदार / व्यावसायिक व्यक्तींनी कोविड चाचणी करुन घेणे अनिवार्य असल्याचे आदेश इंन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिले आहेत. 21 मार्च पर्यंत दुकानदार व व्यवसायिकांनी कोव्हीड चाचणी न केल्यास त्यांना दुकाने तसेच व्यवसाय सुरू ठेवता येणार नसल्याचे आदेशही डॉ. जगताप यांनी दिले आहेत.

         फलटण तालुक्यामध्ये पुर्णत: लॉकडाऊन नसल्याने व बहुतांशी दुकाने व व्यावसायिक आस्थापना सुरु असल्याने त्या ठिकाणी अनेक नागरिकांची ये-जा सुरु आहे. दुकानदार अथवा व्यावसायिक आस्थापनेवरील व्यक्ती / कामगार यांचा प्रत्येक दिवशी अनेक ग्राहकांशी संपर्क येत असल्याने कोविड प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व दुकानदार / व्यावसायिक व्यक्तींनी कोविड चाचणी करुन घेणे अनिवार्य असल्याचे आदेश देण्यात येत असून, जर दि. २१ मार्च २०२१ पुर्वी संबंधितांनी कोविड चाचणी करुन न घेतल्यास संबंधित दुकान / आस्थापना सुरु ठेवण्यात येऊ नयेत. असे आदेश  उपविभागीय दंडाधिकारी फलटण उपविभाग फलटण तथा इंन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप यांनी पारित केले आहेत.

No comments