ऊसतोड राहिली असल्यास संपर्क साधावा- श्री दत्त इंडिया
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण - साखरवाडी ता. फलटण येथील श्री दत्त इंडिया कंपनीचा न्यू फलटण शुगर वर्क्स या कारखान्याचा या वर्षीचा गळीत हंगाम मंगळवार दि. ३० मार्च रोजी बंद होणार आहे. तरी कारखाना कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील सर्व ऊस उत्पादकांनी आपला नोंदीचा ऊस कोणत्याही कारणाने शेतात शिल्लक असल्यास अशा शेतकऱ्यांनी कारखान्याच्या नजिकच्या शेती विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन दत्त इंडिया कंपनी मार्फत प्रशासकीय अधिकारी अजित जगताप यांनी केलेले आहे. ज्या शेतकऱ्यांचा ऊस कोणत्याही कारणाने तोडणीचा राहिलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी स्वतः ऊस तोडणी व वाहतूक करुन कारखान्यास सत्वर गळीतास पाठवावा असे अजित जगताप यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
No comments