महाराष्ट्रात आज 16620 कोरोना बाधीत रुग्ण
गंधवार्ता वृत्तसेवा, दि. 14 मार्च 2021 - महाराष्ट्रात कोरोना संसर्ग चिंताजनक पातळीने वाढत आहे. राज्यात सलग तिसऱ्या दिवशी १५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यात आज 16620 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे.
आज नवीन 8861 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2134072 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 126231 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.21% झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
No comments