Breaking News

मान्यवरांच्या उपस्थित सुवर्णस्पर्श फाऊंडेशनचा उद्घाटन सोहळा संपन्न

Inauguration Ceremony of Suvarnasparsh Foundation

     गंधवार्ता वृत्तसेवा फलटण - महिला दिनाचे औचित्य साधून सौ. पुष्पांजली लक्ष्मण मगर, पोलीस हवालदार सौ. सविता अवघडे, जाधववाडी ग्रामपंचायत सरपंच सीमा गायकवाड,  फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. प्रगती भाऊसो कापसे, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कुलच्या संचालिका सौ. संध्या गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुवर्णस्पर्श फाऊंडेशन या संस्थेचा उद्घाटन सोहळा जाधववाडी येथे संपन्न झाला.

        सामाजिक कार्यकर्त्या पुष्पांजली मगर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना,   बिदाल, ता. माण येथे महिलांना एकत्र करत पाणी फौंडेशन च्या मार्गदशनाखाली आमचे काम चालू असल्याचे सांगून, इथेही महिलांनी संघटन करून  मोठे काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली .

        पोलीस हवलदार सौ सविता अवघडे यांनी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करून,  मुलगी व सून या यामध्ये फरक करू नये. तसेच महिलांनी बाहेरची व घरातील जबाबदारी व्यवस्थित पार पाडायला शिकावे असा सल्ला दिला.

        जाधववाडी च्या सरपंच सीमा गायकवाड यांनी, या संस्थेला आमचे सहकार्य राहील असा शब्द देतानाच महिलांनी बाहेर पडून सामाजिक कार्यात उतरावे असे आवाहन महिलांना केले.

        यावेळी नगरसेविका सौ प्रगती कापसे यांनी महिलांना मार्गदर्शन करून, महिलांनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकले पाहिजे. महिलांनी आत्मनिर्भर झाले  पाहिजे असे आवाहन केले.

        महिलांच्या साठी अल्पदरात विविध प्रकारचे कोर्सेस उपलब्ध करून देऊन ग्रामीण भागातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करून महिला व मुलींना आर्थिक सबल करण्याच्या उद्देशाने जाधववाडी तालुका फलटण येथे सुवर्णस्पर्श फाउंडेशनची स्थापना करण्यात आली असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा शबाना नसीम पठाण यांनी सांगितले.

        उद्घाटन सोहळ्याप्रसंगी  ग्रामपंचायत सदस्य स्वाती जाधव, उद्योजिका दीक्षा येवले, नीता गोसावी, कॉन्व्हेंट स्कूल च्या संचालिका सौ संध्या गायकवाड यांनीही महिलांना मार्गदर्शन केले.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णस्पर्श फाऊंडेशनच्या सचिव सौ जयश्री पाटणे यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष सचिन बनसोडे यांनी केले. आभार प्रदीप नाळे यांनी मानले.

No comments