मान्यवरांच्या हस्ते आज फलटण - पुणे रेल्वेसेवेचा शुभारंभ
Inauguration of Phaltan-Pune railway service by dignitaries today
फलटण ते पुणे या नियमित डेमू रेल्वेसेवेचा शुभारंभ मंगळवार दि. 30 मार्च रोजी दुपारी 3 वाजता केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते ऑनलाइन होणार आहे. ऑनलाइन पध्दतीने होणाऱ्या या उदघाटन सोहळ्यास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार शरद पवार, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार वंदना चव्हाण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार सुनील कांबळे व फलटणच्या नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे आदींची ऑनलाइन उपस्थिती राहणार आहे.
मंगळवार दि. ३० मार्च रोजी फलटण रेल्वे स्थानकावरुन उदघाटनानिमित्त विशेष गाडी चालविण्यात येणार आहे.
No comments