Breaking News

गुणवरे येथील जुनी चावडी व सामाजिक सभागृहाच्या दुरुस्ती व बांधकामाचा शुभारंभ

जुनी चावडी व सामाजिक सभागृहाच्या दुरुस्ती व बांधकामाचा शुभारंभ करताना सरपंच सौ. शशीकला गावडे
Inauguration of repair and construction of old Chawdi and Social Hall at Gunavare

        फलटण प्रतिनिधी - गुणवरे ता. फलटण येथील वार्ड क्रमांक २ मधील दलित वस्तीतील जुनी चावडी आणि अण्णाभाऊ साठे नगर मधील सामाजिक सभागृह या दोन्हीची दुरूस्ती व बांधकामांचा शुभारंभ सरपंच सौ. शशीकला गावडे यांचे शुभहस्ते नुकताच करण्यात आला. सदरची मंजुर कामे १४ व्या वित्त आयोगातुन करण्यात येत आहेत. अन्य कामांची सुरुवातही आगामी काही दिवसांमध्ये केली जाणार असल्याचे सौ. गावडे यांनी सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव गावडे, गुणवरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रा.  रमेश आढाव,  सदस्या सौ. सविता आढाव, ग्रामपंचायत सदस्य अंकुश गरगडे सर, राणुबाई आढाव, मिनाताई कांबळे, बापुराव कणसे, सेवानिवृत्त पोलिस हवालदार चव्हाण, ऋषीकेश आढाव, कैलास आढाव, दिपक आढाव, गोविंद आढाव, हरि नाळे, सुरेश रामहरी आढाव, अण्णा मुरलीधर आढाव, बाळासाहेब गौंड, तुकाराम गावडे, युवराज बागाव यांचेसह विविध संस्थाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
जुनी चावडी व सामाजिक सभागृहाच्या दुरुस्ती व बांधकामाचा शुभारंभ करताना उपसरपंच प्रा.  रमेश आढाव

No comments