Breaking News

ताथवडा घाटात जेरबंद केलेल्या टोळीकडून दुसऱ्या गुन्ह्यातील दागिने व मोबाईल हस्तगत

Jewelry and mobile phone were seized from a gang arrested in Tathawada Ghat

        गंधवार्ता वृत्तसेवा फलटण -  ताथवडा घाट परिसरात रात्री फलटण ग्रामीण पोलीस पेट्रोलिंग करत असताना , दरोडा घालण्याच्या तयारीत असणारी सहा जणांची टोळी आढळून आली, पोलिसांनी त्यांना दोन्ही बाजूने घेरून त्यातील चौघांना जेरबंद केले होते. त्यांच्याकडून कोयता, चाकू, मिरची पूड व 2 मोटार सायकल असे साहित्य जप्त करण्यात आले होते. त्यांनतर त्यांच्याकडे विचारपूस केली असता, वीर धरण येथे जोडप्याकडून दमदाटी व बळजबरीने दागिने व मोबाईल घेतले असल्याचा गुन्हा उघडकीस आला. शिरवळ पोलीस ठाण्यात नोंद असणाऱ्या या गुन्ह्यातील दागिने व मोबाईल हस्तगत करण्यात फलटण ग्रामीण पोलिसांना यश आले असून, ताथवडा घाटात दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीस जेरबंद करून या टोळीकडून दुसऱ्या गुन्ह्यातील दागिने व मोबाईल हस्तगत केल्याने फलटण ग्रामीण पोलिसांचे अभिनंदन होत आहे.

        फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 1 मार्च 2021 रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस उप निरीक्षक शेख, पो.कॉ. अवघडे ,पो.कॉ. कुंभार व चालक पो.ना. यादव हे पोलिस वाहनात व दुसऱ्या खाजगी वाहनाने , पो. ना. अभिजात काशीद, पो.ना. देवकर पो.कॉ. जगदाळे पो.कॉ. पाटोळे असे तथावडा परिसरात पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना ताथवडा घाटाचे दुसरे वळणावर तिन पल्सर मोटार सायकल व तेथे थांबलेले सहा इसम दिसल्याने, पोलिसांनी त्यांना दोन्ही बाजुनी घेरले असता, सरकारी वाहन पाहुन त्यामधील दोन इसम त्यांच्याकडील मोटार सायकलवरुन पळुन गेले. मात्र पोलिसांनी उर्वरित चार इसम 1) योगेश बाजीराव मदने वय ३० वर्षे रा. राजापुर ता.खटाव जि.सातारा २) सनि ऊर्फ सोन्या धनाजी भंडलकर वय २३ वर्षे रा चौधरवाडी ता.फलटण ३) प्रथमेश ऊर्फ सोनु हणमंत मदने वय २१ वर्ष रा.उपळवे ता.फलटण ४) किशोर हणमंत जाधव वय १९ वर्षे रा ताथवडा ता. फलटण  यांना ताब्यात घेतले. पळून गेलेले इसम नामें ५) महेश ऊर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे वय २५ वर्ष रा मोती चौक फलटण ६) किरण मदने पुर्ण नाव माहित नाही रा. राजापुर ता.खटाव असे एकुण सहा इसम यांनी ८०,०४०/- किंमतीचा माल व हत्यारे जवळ बाळगुन मौजे ताथवडा ता.फलटण गावचे हद्दीत ताथवडा घाटात, दरोडा घालण्याच्या तयारीनिशी एकत्र मिळुन आले व छाप्याचे वेळी १ ते ४ आरोपी यांना जागीच पकडले असुन, त्याचे अजुन दोन साथीदार सरकारी वाहन पाहून त्यांचे मोटार सायकलवरुन घाटातून पळुन गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला परंतु ते  सापडले नाहीत.

        सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शेख यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करून पकडलेल्या आरोपींना विश्वासात घेवून त्यांचेकडे विचारपुस करून,  शिरवळ पोलीस ठाणे येथे भादवि स कलम ३९४ प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपास मध्ये त्यांनी बजाज पल्सर मोटर सायकलवरून दि.२३ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी १.०० वा.चे सुमारास विरधरण पात्रामध्ये काठावर बोलत बसलेल्या एका अनोळखी जोडप्यास दमदाटी करून, त्यांचे जवळ असलेले सोन्याचे दागिने व मोबाईल बळजबरीने चोरू नेल्याची कबुली दिली. त्यानुसार फलटण ग्रामीण पोलिसांनी  त्यांचेकडुन १)३०,०००/- रू किमंतीची गळयातील सोन्याची चैन व बदाम  वजन ६.२३० ग्रॅम.२)५०००/ रू किमतीचे कानातील सोन्याचा टॉप्सचा जोड वजन १.५५० ग्रॅम ३)५०००/- रु किमतीचा एम.आय नोट-४ कंपनीचा एक मोबाईल हॅन्डसेट असा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.

        सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक श्री.अजयकुमार बन्सल, अप्पर पओलीस अधिक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे व पोलीस निरीक्षक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक बोंबले, पोलीस उपनिरीक्षक शेख, पो. ना. देवकर, पो. ना. तुपे, चालक पो. ना. यादव, पो. कॉ. कुंभार, पो. ना. काशिद, पों. कॉ. जगदाळे, पो. को.पाटोळे यांनी केली आहे.

No comments