Breaking News

मंत्री विजय वडेट्टीवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

Minister Vijay Vadettiwar's corona test positive

        गंधवार्ता वृत्तसेवा दि. 5 मार्च 2021 - राज्याचे इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकंप पुनर्वसन या विभागांचे कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांची अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांनी, नागरिकांनी सुद्धा आपली काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

         काँग्रेसचे नेते  मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ट्विटरवर ट्विट करून कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अर्थसंकल्पीय अधिवेशन निमित्त मुंबई येथे असून, आज कोरोना चे लक्षण दिसल्याने मी माझी कोव्हीड टेस्ट केली, टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार मी घेत आहे.  लवकरच पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल. मागील 2 दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांनी ,नागरिकांनी सुद्धा आपली काळजी घ्यावी ही विनंती.

No comments