भांडणात महिलेचा विनयभंग ; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण - घराचे वाटप व इतर कारणावरून झालेल्या भांडणात महिलेसह तिचे पती, आज्जीसासू व इतरांना मारहाण करून महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून, महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सोमवार पेठेतील 7 जणांच्या विरोधात पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याच भांडणाप्रकरणी विरोधी पक्षाने देखील फिर्यादीच्या नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.
दिनांक 21 मार्च 2021 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सोमवार पेठ, फलटण येथे पीडित महिलेच्या घरासमोर, तिची सासू ताया पवार हिने, तू माहेरून काही आणले नाहीस, हुंडा आणला नाही, त्यामुळे तू इथे राहायचे नाही व घराच्या वाटपाच्या कारणावरून शिवीगाळ दमदाटी व मारहाण केली. त्यानंतर सोमा मारुती जाधव, अर्जुन सोमनाथ जाधव, करण राजू जाधव, सागर सोमा जाधव, उमेश शाम पवार, तेजस शाम पवार, ताया शाम पवार सर्व राहणार सोमवार पेठ फलटण यांनी आपापसात संगतमत करून पीडित महिलेस तसेच तिच्या आज्जीसासू येल्लूबाई पवार, रुपेश पवार, शांताबाई पवार, चुलत सासरे शिवाजी पवार यांना शिवीगाळ दमदाटी करून हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच वेळी त्यांच्यातील एकाने पीडित महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले असल्याची फिर्याद पीडित महिलेने फलटण शहर पोलीस स्टेशनला दिली आहे, त्यानुसार सोमवार पेठ फलटण येथील 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments