सातारा जिल्हा केटरर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निरज गायकवाड
सातारा - सातारा जिल्ह्यातील केटरर्स असोसिएशनच्या निवडीची प्रक्रिया नुकतीच सातारा शहरातील गजानन मंगल कार्यालय येथे पार पडली. आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत सातारा जिल्हा केटरर्स असोसिएशनच्या नूतन अध्यक्षपदी श्रीहरिओम केटरर्स चे नीरज गायकवाड यांची निवड करण्यात आली, तर कार्याध्यक्षपदी स्नेहदीप केटरर्स चे संजय देशपांडे यांची निवड करण्यात आली. या बैठकीसाठी अध्यक्ष म्हणून साताऱ्यातील श्री मंगल सेवा केटरर्सचे ज्येष्ठ मार्गदर्शक उदय शेठ गुजर हे होते.
सातारा जिल्हा केटरिंग असोसिएशन च्या पदाधिकारी निवडीमध्ये अध्यक्षपद निरज गायकवाड कार्याध्यक्षपदी स्नेहदीप केटरर्स चे दीपक देशपांडे, उपाध्यक्ष म्हणून अमोल शिंदे ,मिठालाल गुजर ,दयानंद जाधव यांची निवड करण्यात आली तर खजिनदारपदी रमेश कोळी पाटील सहखजिनदारपदी रवी थेटे सचिव जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून भरव भरत वैष्णव आणि या संघटनेच्या सदस्यपदी शांतीलाल रावळ ,अभिजीत घाडगे ,महेश माने, प्रकाश सोडमिसे ,अभिषेक कुलकर्णी तसेच सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील निवडण्यात आलेला एक सदस्य हा जिल्हा असोसिएशनवर घेण्यात येणार आहे अशी माहिती सचिव भरत वैष्णव यांनी दिली.
उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन करताना नूतन अध्यक्ष नीरज गायकवाड म्हणाले की आपण सर्वांनी अध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. मात्र एक आपणा सर्वांना पैकीच सभासद म्हणून मी या संघटनेचे काम करीत आहे .आपण सर्वजण सदस्य हे अध्यक्षांसारखेच आहात. संघटनेच्या वाढीसाठी सर्व बंधू-भगिनींनी एकत्र येऊन आपली संघटना मोठ्या प्रमाणात वाढवण्याची आहे .तसेच सर्व सभासदांसाठी नवनवीन व्यवसायातील कल्पना सर्वान पर्यंत पोहोचण्यासाठी आपण सर्वांचे सहकार्य मला मिळेल असे मी अपेक्षित करतो .
अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करताना उदय शेठ गुजर म्हणाले की सर्व व केटरर्स एकाच छताखाली येण्यासाठी सर्वांचे संघटन होणे गरजेचे होते. या संस्थेच्या उभारणीसाठी आपण सर्वांनी एक दिलाने सहकार्य करून ही संघटना वाढवूया.
नूतन कार्याध्यक्ष संजय देशपांडे यांनी कार्यकारणीची निवड झाली असली तरी संघटनेच्या शुभारंभासाठी एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी राज्य पातळीवरील केटरर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. संघटनेच्या माध्यमातून सर्व व्यवसायिक बंधूंनी एकत्र येऊन आपली एकी दाखवण्याची गरज आहे आणि लवकरात लवकर जिल्ह्यातील सर्व केटरर्स या संघटनेचे सभासदत्व स्वीकारतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.
नूतन उपाध्यक्ष अमोल शिंदे यांनी सर्व सभासदांचे स्वागत करून आभार मानले .या बैठकीसाठी दयानंद जाधव, रमेश कोळे पाटील, रवि थेटे ,अभिजीत घाडगे ,शांतीलाल रावळ, प्रकाश सोडमिसे ,महेश माने, अभिषेक कुलकर्णी, राहुल भोसले, प्रदीप कुलकर्णी श्री .पडवळ श्री .मोमीन श्री .कुंभार -मेढा ,श्री .बाबर -वडूज ,फलटण येथील अब्दुल केटरर्स, पाटण येथील कुंदन पवार व श्री. कोळी तर कराड येथील श्री. परमार उपस्थीत होते.
No comments