संचारबंदी आदेशाचे पालन करावे अन्यथा कारवाई - पोलीस प्रशासनाकडून इशारा
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण - जिल्हाधिकारी सातारा यांनी जारी केलेल्या संचार बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर तसेच दुकानदारांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. तर सर्व नागरिकांनी व व्यवसायिक यांनी जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या संचारबंदी आदेशाचे पालन करावे असे आवाहन फलटण शहर पोलीस ठाणे मार्फत तसेच ग्रामीण पोलिस स्टेशनमार्फत करण्यात आले आहे.
दिनांक 28/3/2021 रोजी पासून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी रात्रीचे 08:00 ते सकाळी 07:00 वाजेपर्यंत संचारबंदी आदेश जारी केल्या नंतर, फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत फलटण शहर पोलीस स्टेशन मार्फत जिल्हाधिकारी सातारा यांचे आदेश नागरिकांना अनाउन्समेंट करून कळवण्यात आले. पोलीस प्रशासनाने यावेळी शहरातील मुख्य मार्गावरून संचलन करून नागरिकांना संचारबंदी काळात बाहेर न फिरण्याचे आवाहन करण्यात आले. संचलनाचा मध्ये 3 चार चाकी वाहने, 5 मोटरसायकली मध्ये 3 पोलीस अधिकारी 20 पोलीस अंमलदार व 5 होमगार्ड यांनी सहभाग घेतला होता.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्याकडूनही ग्रामीण भागामध्ये जिल्हाधिकारी यांचे संचारबंदी चे आदेश नागरिकांचे पर्यंत अनाउन्समेंट याद्वारे पोहोचवण्यात आले तसेच या आदेशाचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले
No comments