Breaking News

विरोधकांनी फक्त विकासकामात अडथळे आणण्याचे काम केले- श्रीमंत रामराजे ; फलटण शहर तालुक्यातील विकासकामांसाठी 275 कोटींचा निधी

पत्रकार परिषदेत बोलताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शेजारी  आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर
Opponents only obstructed development work - Shrimant Ramraje ;275 crore sanctioned for development works in Phaltan city taluka 

फलटण-सातारा रस्ता होणार सिमेंट काँक्रीटचा

 फलटण-सातारा (आदर्की-मिरगाव- फलटण रा. मा. १४९ कि. मी. ०/०० ते २६/४००) वाठार निंबाळकर फाटा ते आदर्की फाटा (फौजी ढाबा) हा संपूर्ण रस्ता १० मीटर रुंदीने सिमेंट कॉक्रीटचा करणेसाठी एशियन डेव्हलपरमेंट बॅक सहाय्य निधीतून राज्याच्या अर्थसंकल्पीय तरतूदींमधून १७६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 

        गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण - फलटण शहरासाठी महत्वकांक्षी व उपयुक्त असणारी 100 कोटींची भूमिगत गटार योजना पूर्ण होत असून, सध्या ही योजना अंतिम टप्प्यात आहे तसेच फलटण शहरातील  सर्व रस्त्यांसाठी 12 कोटी 80 लाखांचा निधी मंजूर झाला असून, शहरातील 67 रस्त्यांच्या खडीकरण - डांबरीकरण करण्यास सुरुवात झालेली आहे. फलटण सातारा रोड मधील वाठार निंबाळकर फाटा ते आदर्की फाट्या पर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण होणार असल्याचे सांगतानाच फलटण शहर व तालुक्यातील रस्ते पूल प्राथमिक शाळा अंगणवाडी इमारती व इतर विकास कामे यासाठी 274 कोटी 98 लाख रुपयांची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याचे विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विरोधकांचा समाचार घेताना, विरोधकांनी फक्त शहरातील विकासकामात अडथळा आणण्याचे काम केले आहे, नगरपालिकेत प्रत्येक विकासकामांच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत,  नीरा देवघरच्या पाणीप्रश्नावर देखील जनतेची दिशाभूल केली होती, विरोधकांनी फक्त विरोध करण्याचे काम केले असल्याचे श्रीमंत रामराजे यांनी सांगितले.

        फलटण येथील लक्ष्मी विलास पॅलेस या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमंत रामराजे बोलत होते यावेळी आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नगर परिषद बांधकाम समिती सभापती श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे उपस्थित होते.

        श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर पुढे बोलताना म्हणाले, फलटण शहरात सध्या  भूयारी गटार योजनेचे काम अंतिम तपातात आहे. हे काम शहराच्या स्वच्छता व आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे अश्या भुयारी गटार योजनेत देखील विरोधकांनी अडथळे आणण्याचे काम केले आहे. भुयारी गटार योजनेचे काम सुरु असताना शहरातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असली तरी ज्या ठिकाणी सध्या भूयारी गटार योजनेचे काम पूर्ण होत आहे , जे रस्ते खराब झालेत त्या रस्त्याची कामे सुरु देखील होत आहेत. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय लवकरच थांबणार आहे.

        विरोधक निरा–देवधरच्या पाण्यावरुन अजूनही विरोधक सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.  विरोधकांनी निरा देवघरच्या पाण्यावरून विनाकारण राजकारण करून 36 गावांचे पाणी बंद केले होते.  विरोधक फक्त अडथळे आणण्याचे काम करीत असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.

शहरातील 67 रस्त्यांच्या खडीकरण - डांबरीकरण कामाचा शुभारंभ प्रसंगी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर,  नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे

        फलटण शहर तालुक्यातील विकासकामांसाठी केलेल्या 275 कोटींच्या तरतुदीविषयी  बोलताना, श्रीमंत रामराजे म्हणाले, फलटण शहर व तालुक्यातील रस्ते पुल प्राथमिक शाळा, अंगणवाडी इमारती, अन्य विकास कामांसाठी २७५ कोटी ९८ लाख रुपयांची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. एशियन डेव्हलपमेंट बँक सहाय्य निधीतून राज्याच्या अर्थसंकल्पीय तरतुदीद्वारे फलटण-सातारा रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण १७६ कोटी, फलटण शहरातील रस्त्यांसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून १२ कोटी, ग्रामीण भागातील विविध रस्ते पुलांसाठी अर्थसंकल्पीय तरतुदी मधून ६३ कोटी, नाबार्ड २६ मधून ४ रस्त्यावरील पुलांसाठी ४ कोटी ९१ लाख, स्थानिक विकास निधीतून ७ कोटी ९ लाख, अर्येसंकाल्पीय तरतुदी व अन्य योजनांतून जिल्हा परिषद बांधकाम विभाग ११ कोटी, दलित वस्ती सुधार योजनेतून ९८ लाख असे एकूण २७४ कोटी ९८ लाख रुपये मंजूर झाले असल्याची माहिती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

नाबार्ड २६ योजनेतून फलटण-आसू- तावशी रस्त्यावर,पिंपळवाडी-फडतरवाडी रस्ता, तरडगाव-सासवड-घाडगेवाडी-माळवाडी रस्ता, पाडेगाव-रावडी-आसू रस्ता या ४ रस्त्यावर पूल बांधणीसाठी ७ कोटी ९१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.फलटण तालूक्यातील विविध १८ रस्त्यासाठी ६३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, तालुक्यातील २१ गावातील दलित वस्ती सुधारणा योजनेसाठी ९८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

         स्थानिक आमदार विकास निधीतून १२ गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या जागेत अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण, छोटे पूल बांधकाम, भूमीगत गटार, पेव्हिंग ब्लॉक वगैरे कामे यासाठी ७ कोटी ९ लाख रुपये मंजूर आहेत.

         सातारा जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील विविध कामासाठी राज्य अर्थसंकल्पीय तरतूद व अन्य योजनांतून ११ कोटी १ लाख ३३ हजार रुपये मंजूर असून त्यामध्ये खालील कामाचा समावेश आहे. जिल्हा परिषद सेस फंडातून ७ लाख रुपये २ रस्त्यांच्या कॉक्रीटीकरण कामासाठी मंजर आहेत, ३०५४ मार्ग व पूल योजनेतून २ कोटी ६६ लाख ५० हजार रुपये १३ रस्त्यांसाठी मंजूर करण्यात आले आहेत.

        ७ गावात नवीन शाळा खोल्या बांधकामासाठी ८९ लाख रुपये, २ गावातील शाळा खोल्या दुरुस्तीसाठी २३ लाख रुपये, ३८ गावात अंगणवाडी इमारत बांधकामासाठी ३ कोटी २३ लाख रुपये, ३ गावातील अंगणवाडी इमारत दुरुस्तीसाठी २ लाख ३३ हजार रुपये, ७ गावातील क वर्ग यात्रा स्थळांच्या ठिकाणी मंदिर व भक्त निवास परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे, अंतर्गत रस्ते, भोजन हॉल, किचन हॉल उभारणी वर्गैरेसाठी ३१ लाख रुपये, १२ गावातील नागरी सुविधांसाठी ५५ लाख रुपये, ४९ गावातील जन सुविधांसाठी र कोटी २४ लाख रुपये, पंचायत समिती सेस मधून २२ गावातील विकास कामासाठी ४१ लाख ६ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

        फलटण शहरातील विविध प्रभागातील ६७ रस्त्यांच्या खडीकरण डांबरीकरण कामांसाठी राज्य शासनाच्या वैशिष्टयपूर्ण कामासाठी अनुदान योजनेतून ११ कोटी ७९ लाख २० हजार रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

No comments