Breaking News

शब-ए-मेराज व शब-ए-बारात च्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी यांनी केले आदेश जारी

Order issued by the District Magistrate in connection with Shab-e-Meraj and Shab-e-Barat

        सातारा दि.10 (जिमाका): सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याच्या शब-ए-मेराज व शब-ए-बारात उत्सव अत्यंत साधेपणाने व शासनाने वेळोवेळी दिलेल्या नियमांचे तसेच सामाजिक अंतराचे पालन करुन साजरा करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी संहिता, 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त असलेल्या अधिकारान्वये शब-ए-मेराज (चंद्रदर्शनावर अवलंबून) उत्सव दि. 11 मार्च रोजी 0.00 वा. पासून ते  दि. 12 मार्च रोजीच्या 24.00 वा. या कालावधीत व शब-ए-बारात  (चंद्रदर्शनावर अवलंबून) उत्सव दि. 28 मार्च रोजीच्या 0.00 वा. पासून ते  दि. 29 मार्च रोजीच्या 24.00 वा. या कालावधीत  पुढील आदेश जारी केले आहेत.

        शब-ए-मेराज व शब-ए-बारात सर्व मुस्लीम धर्मीय बांधव आपाआपल्या विभागातील मशिदीत रात्रभर नमाज, कुराण व दुवा पठण करतात. त्यामुळे बहुसंख्य मुस्लीम वस्तीत रात्रभर मुस्लीम बांधवांची वर्दळ असते. तसेच काही ठिकाणी वाझ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कोविड – 19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी दि. 11 मार्च रोजीची रात्री व दि. 12 मार्च रोजीची पहाट या कालावधीत शब-ए-मेराज (चंद्रदर्शनावर अवलंबून) व दि. 28 मार्च  रोजीची रात्र व दि. 29 मार्च रोजीची पहाट या कालावधीत (चंद्रदर्शनावर अवलंबून) येणाऱ्या शब-ए-बारात या उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे मिरवणुकांचे आयोजन न करता मशिदीत अथवा घरात दुवा पठण करावी. शब-ए-मेराज व शब-ए-बारात  निमित्त स्थानिक मशिदीत नमाज पठणा करीता येणाऱ्या मुस्लीम बांधवांनी कोणत्याही प्रकारची गर्दी न करता एकावेळी  40 ते 50 व्यक्तिंनी टप्प्या-टप्प्याने सामाजिक अंतराचे पालन व मास्कचा वापर करुन दुवा पठण करावे. मशिदीतील व्यवस्थापक यांनी आजूबाजूच्या परिसरात निर्जंतुकीकरणाची व्यवस्था, सामाजिक अंतराच्या व स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इ. ) चे पालन होईल याकडे लक्ष द्यावे. शब-ए-मेराज व शब-ए-बारात दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन शक्यतो बंदीस्त जागेत करावे. परंतु खुल्या जागेत आयोजन केल्यास कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही व त्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन होईल याची दक्षता घेण्यात यावी. कोविड-19 च्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात लागू असलेल्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 अन्वये जारी केलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे. शब-ए-मेराज व शब-ए-बारात च्या अनुषंगाने वाझ कार्यक्रमाचे आयोजक यांनी कार्यक्रमाची सुविधा केबल नेटवर्क, इत्यादीवर उपलब्ध करुन द्यावी.

        वरील आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधिीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास त्यांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद केले आहे.

No comments