Breaking News

संगणकीकृत सातबारा मधील प्रलंबित नोंदी निर्गत करण्यासाठी 23 मार्च रोजी कॅम्पचे आयोजन - जिल्हाधिकारी शेखर सिंह


Organizing the camp on March 23 to release the corresponding records in the computerized Satabara

        सातारा  (जिमाका): राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ई-फेरफार प्रणालीमध्ये जिल्ह्यातील 100 टक्के अधिकार अभिलेखांचे संगणकीकरण कामकाज सुरु आहे. त्यामध्ये खरेदी विक्री, वारस नोंदणी, बँक बोजा, ई-करार व इतर नोंदी निर्गत करुन सातबारावरील नोंदी अद्यावत करण्याचे काम केले जात असून  नोंदी मंडलाधिकारी व तहसीलदार यांच्यास्तवर प्रलंबीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रलंबीत नोंदी निर्गमित करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक मंडलस्तरावर मंडल अधिकारी व तलाठी यांनी 23 मार्च रोजी सकाळी 11 ते 5 या वळेत एक दिवसीय कॅम्पचे आयोजन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह सर्व उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत.

        कॅम्पच्या ठिकाणी संबंधित तलाठी यांनी गावांचे फेरफार संचिका घेऊन वेळेवर हजर रहावे. 23 मार्च रोजी एक दिवसीय कॅम्पचे आयोजन करुन त्या दिवशी प्रलंबित असलेल्या नोंदी 100 टक्के निर्गत करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशा नमुद केले आहे.

No comments