Breaking News

दुचाकी वाहनाची पादचाऱ्यास धडक; 2 जखमी

A person is hit by a two-wheeler while walking

        गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 17 मार्च - जाधववाडी तालुका फलटण येथे साई मंदिराच्या समोर दोन पादचाऱ्यांना पाठीमागून मोटरसायकलने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये एक पादचारी व दुचाकी वाहनाच्या पाठीमागे बसलेला व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत.

        फलटण शहर पोलीस स्टेशन वरून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 16 मार्च 2021 रोजी सायंकाळी 7.15 वाजता च्या सुमारास जाधववाडी तालुका फलटण गावचे हद्दीत निरगुडी ते फलटण जाणाऱ्या रोडवर साई मंदिराच्या समोर, नरेंद्र सतीश जाधव व निलेश मोहन जाधव हे साई मंदिराचे पुढील मेडिकल मध्ये गोळ्या आणण्याकरिता पायी जात असताना, नरेंद्र सतीश जाधव यास पाठीमागून निरगुडी बाजूकडून फलटण बाजूकडे एक बजाज प्लेटिना मोटरसायकल 2019-20 मॉडेलची काळी -पांढरे रंगाची बिगर नंबर प्लेटची दुचाकी त्यावरील चालक सचिन आडके राहणार मठाचीवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा याने सदरची मोटरसायकल भरधाव वेगात चालवून नरेंद्र जाधव यास पाठीमागून धडक देऊन अपघात करून अपघातात नरेंद्र जाधव यास गंभीर जखमी करून मोटरसायकल वरील पाठीमागे बसलेला इसम सुरज तानाजी भोईटे राहणार राजाळे यासही जखमी करून उपचारास दवाखान्यात न नेता अथवा अपघाताची खबर पोलीस स्टेशनला न देता पळून निघून गेला असल्याची फिर्याद मुकुंद हनुमंत जाधव यांनी दिली आहे.

 पुढील तपास पोलीस नाईक महेश बोडरे हे करीत आहे.

No comments