Breaking News

भारत बंद ला फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचा पाठिंबा

 Phaltan Taluka National Congress support for Bharat Bandh

गंधवार्ता वृत्तसेवा फलटण - केंद्रातील भाजपा सरकारने शेतकरी विरोधी केलेले तीन काळे कायदे रद्द करण्यात यावेत तसेच इंधन दरवाढ मागे घेण्यात यावी यासाठी दि. २६ मार्च २०२१ रोजी भारत बंद ची हाक दिलेली आहे, या बंद ला पाठिंबा देत फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस च्या वतीने राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी सचिन सुर्यवंशी बेडके, तालुका अध्यक्ष महेंद्र सुर्यवंशी बेडके यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 10:30 वाजता तहसीलदार  यांना निवेदन देण्यात येणार आहे.  यावेळी फलटण तालुका, शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी तसेच युवक काँग्रेस,महिला काँग्रेस व फ्रंटल सेलचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. 

याप्रसंगी शेतकरी, व्यापारी, लघुउद्योजक व नागरिकांनी उपस्थित रहावे व भारत बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments