Breaking News

वाढत्या कोरोनामुळे फलटणचा आठवडी बाजार बंद - मुख्याधिकारी प्रसाद काटकर

Phaltan weekly market closed due to rising corona - Chief Officer Prasad Katkar

        गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 16 मार्च 2021 - शहरातील सर्व दुकानदार, फळे, भाजी विक्रेते, तसेच शहरातील सर्व नागरिक यांना कळविणेत येते की, कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, फलटण नगर परिषद क्षेत्रातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून रविवार दि. 21 मार्च 2021 रोजीचा फलटणचा आठवडी बाजार  बंद ठेवण्याचे आदेश फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिले आहेत.

        फलटण शहरातील  रविवारीचा आठवडे बाजार बंद ठेवण्याबाबत नगरपरिषदेच्या वतीने अनाउन्समेंट देखील करण्यात आली असून, सोशल मीडिया तसेच इतर माध्यमातून बंदचे आदेश प्रसारित करण्यात आले आहेत. मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, शहरातील तमाम नागरीकांना तसेच भाजीपाला, फळ विक्रेते यांना कळविणेत येते की, फलटण शहराच्या आसपास व शहरामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे दक्षता म्हणून दिनांक २१/०३/२०२१ रोजी पासून होणारा प्रत्येक आठवडयातील रविवारचा आठवडा बाजार पुढील आदेश होई पर्यंत बंद राहील. याची सर्व भाजीपाला व फळ विक्रेते यांनी नोंद घ्यावी व नगरपरिषदेस सहकार्य करावे. नियमीत मास्क वापरा. सोशल डिस्टसींगचे पालन करा,  सॅनिटायझरचा वापर करा. हात वेळोवेळी साबणाने स्वच्छ धुवा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments