Breaking News

मास्क न वापरणाऱ्या व सोशल डिस्टनसिंगचे पालन न करणार्‍यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल

Police file charges against those who do not wear masks

        गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण - मास्क वापर न करणाऱ्या तसेच सोशल डिस्टनसिंगचे पालन न करणाऱ्या नागरिकांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत असून दंडही वसूल केला जात आहे. फलटण शहरात पोलिसांनी दि.18 व 19 मार्च रोजी मास्क न घालणाऱ्या 95 जणांवर तर सोशल डिस्टनसिंगचे पालन न करणाऱ्या 8 नागरिकांच्यावर कारवाई केली आहे.

        फलटण शहरामध्ये कोरोना रोगाचे वाढत असले प्रादुभ्रावाचे अनुषंगाने काल दिनांक 18 मार्च व 19 मार्च रोजी प्रांताधिकारी श्री शिवाजीराव जगताप,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री तानाजी बरडे साहेब,मा.पोलीस निरीक्षक श्री भारत किंद्रे तसेच फलटण शहर पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी यांचे उपस्थितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पृथ्वी चौक, क्रांतिसिंह नाना पाटील चौक तसेच बाजारपेठेमध्ये विदाऊट मास्क, सोशल डिस्टसिंगच्या केसेस संदर्भात मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिमे मध्ये दि. 18 मार्च 2021 रोजी विदाऊट मास्कच्या 47 केसेस करण्यात आल्या व त्यांच्याकडुन 7600 रुपये दंड घेण्यात आला. तर सोशल डिस्टर्सिंगच्या 8 केसेस 8000 रुपये दंड असा एकुण 15600  रुपये दंड आकारण्यात आला आहे.

        दि. 19 मार्च 2021 रोजी फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत प्रमुख चौकातून तसेच बाजारपेठ मध्ये विदाऊट मास्क फिरत असलेल्या 48 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून सदर वेळी त्यांच्याकडून 9,600/- रुपये दंड आकारण्यात आलेला आहे.

        तरी सर्व शहरातील नागरीकांना तसेच दुकानदारांना फलटण शहर पोलीस ठाणे तर्फे आवाहन करण्यात येते की,मा.जिल्हाधिकारी सो,सातारा यांनी जारी केलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन कोणीही करु नये यापुढे उल्लंघन करणारे दुकानदार व नागरीकांवर गुन्हे दाखल करण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी.

No comments