कुरेशीनगर येथे पोलिसांचा छापा ; 16 जनावरांसह 700 किलो मांस सापडले ; 6 जणांवर गुन्हा दाखल
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण - : शहरातील कुरेशी नगर येथे शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात गायीचे मांस व कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १६ जनावरांसह घटनास्थळावरुन 7 लाख ४४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या बाबत फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, सोमवार दि. २२ मार्च रोजी संध्याकाळी साडे आठच्या सुमारास फलटण शहरातील कुरेशी नगर येथे छापा टाकला. या वेळी पोलिसांना गो वंशीय जातीच्या जनावरांची कत्तल करुन शेजारच्या वाडग्यात कत्तलीसाठी डांबून ठेवलेली जनावरे मिळून आली. या प्रकरणी शहर पोलिसांनी जमील कुरेशी, शाहरुख कुरेशी, मुबारक हनिफ कुरेशी, अजीम शरीफ कुरेशी, इरफान याकुब कुरेशी सर्व रा. कुरेशी नगर फलटण या पाचजणांसह कत्तलीसाठी पाणी पुरवठा केलेल्या शहरातील आज्ञात टँकर मालक अशा सहा जणांविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन ७० हजार रुपये किंमतीचे ७०० किलो गोवंशीय जातीचे मांस, एक लाख ७४ हजार रुपये किमतीची 16 गोवंशीय जातीची जनावरे, पाच लाख रुपये किंमतीचा पाण्याचा टँकर व दोनशे रुपये किंमतीचे लोखंडी पाते असा एकुण सात लाख ४४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुध्द महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम व प्राणी छळ अधिनियमाद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या बाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल अतुल बडे यांनी दिली असून तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम करीत आहेत.
No comments