महिला दिन विशेष Women's Day Special
Women's Day Special - A pride moment -Sandhya's achivment
एक बहीणच असते जी तुम्हाला आई सारखी माया लावते, प्रेम करते. बाबा सारखी खरी वाट दाखविते आणि मैत्रिणी सारखी प्रत्येक गोष्ट समजून सांगते. कुठल्याही परिस्थितीत ती ठामपणे माझ्या पाठीशी उभी राहते. देवासारखी सदैव तत्पर असते. “माझी बहिण” अशी ओळख करून देताना अभिमान वाटावा अशी आमची ‘संध्या दीदी’.
हिम्मत व मेहनतत या दोन अशा गोष्टी आहेत ज्या माणसाला कोणत्याही क्षेत्रात विजय मिळवून देतात. म्हणूनच म्हणतात कि, कष्टाने व प्रामाणिकपणे केलेले कोणतेही काम नेहमी यशस्वी होते. या उक्तीप्रमाणेछ प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलच्या संचालिका सौ. संध्या विकास गायकवाड यांना देखील आयुष्यात अनेक अडचणी आल्या पण त्यांना सामोरे जाऊन मोठ्या हिमतीने, विचाराने व सामंजस्याने प्रत्येक कठीण परिस्थितीचा सामना केला. जीवनात आलेल्या अनेक अडचणींना ठाम विचारांनी प्रत्येक गोष्टींचे निरसन केले. हे त्यांनी आपल्या कर्तुत्वाने करून दाखवले.
ज्यांच्यावर स्वतः श्री स्वामी समर्थांचा वरदहस्त आहे अशा श्री. देशमुख काकांचा आशीर्वाद असलेल्या परमप्रिय ‘संध्यादीदी’ असे व्यक्तिमत्व ज्यांचा सहवास आम्हाला लाभला. आमचे अहोभाग्य त्या आमच्या मोठ्या भगिनी आहेत. आम्हाला त्यांचा फार सार्थ अभिमान आहे. त्या आमच्यासाठी माता, पिता, भगिनी, बंधू, गुरु, सखा अशा वेगवेगळ्या अनेक भूमिका साकारतात. त्यांचे स्थान आमच्यासाठी उच्च आहे. आमच्यामध्ये नवनवीन उर्जा निर्माण करण्याचे, विचारांची पातळी वाढविण्याचे आणि अशक्य ते शक्य करण्याचे कार्य प्रेमस्वरूप दीदी करतात. विचाराने व मनाने मोठ्या असलेल्या दीदी आम्हांस गुरुवर्य आहेत.
आम्ही अस्वस्थ व्हावे अन प्रेमाणे मायेची फुंकर घालावी अशा प्रेमळ आमच्या दीदी आहेत. सातत्य, जिद्द, परिश्रम, चिकाटी व परिश्रम या गुणांमुळे त्यांना यश जणू लोटांगण च घालत असते.
प्रामाणिक लोकांच्या जीवनात कितीही अडचणी आल्या तरी देव त्यांची नाव कधीही बुडू देत नाही आणि प्रयत्न केल्याशिवाय हार स्वीकारायची नसते कारण प्रत्येक कष्टाचे फळ हे गोडच असते असे प्रेरणादायी वाक्य दीदी नेहमी म्हणतात.
कष्टाची पराकाष्टा करायला त्या कधीच कमी पडत नाही. विजयाचा मुकुट मिळाला नाही तरी अनुभवाचे मोती नक्की मिळतात. भगवंताची निष्ठा असेल आणि आहे त्या परिस्थितीत समाधान ठेवण्याची सवय असेल तर आनंदी जीवन जगता येते. आनंद हा कोठून निर्माण करायचा नसतो तो आपल्या वृत्तीमध्येच असतो. हे दिदींनी दाखवून दिले आणि हा अनुभव सोबत घेऊन दिदींनी आपल्या यशाची वाट निर्माण केली.
पावलो पावली येणाऱ्या अडचणींना त्या आपल्या शांत वृत्तीने सोडवतात. कितीही अडचणी असल्या तरी त्या मला वेळ देऊन माझ्या विचारांना चालना देण्याचे प्रेरणादायी कार्य करतात. त्या सर्वांच्या प्रेरणास्थान आहेत. म्हणूनच शाळेच्या माध्यमातून त्या आपल्या विचारांची सुरेख अशी रांगोळी घालतात.
शाळेचे कार्य हे सकारात्मक विचारांनी साकारतात. शाळा चालविणे त्यातून दोन-दोन शाखा वाटते तेवढे सोपे कार्य नाही त्यांनी शाळेला जणू वाहूनच घेतले आहे. शाळा चालवताना कोणतीही उणीव जाणवू देत नाहीत. त्या शाळेतील प्रत्येक अडचणींना सामंजस्याने सामोऱ्या जातात.
शाळा चालविणे हे कोणाचेही कार्य नाही हे जणू त्यांनी दाखवूनच दिले आहे.
नवीन सकाळ नवीन किरण अश्या वृत्तीने कार्य करण्याची त्यांची वृत्ती मनाला भुरळ पाडते. सर्वांना समान लेखून, समता एकता दाखवून कार्य करणे हा त्यांचा दृष्टीकोण मला खूप आवडतो. जगात अशी खूप कमी व्यक्ति असतात ज्यांना दुसर्याचे चांगले व्हावे असे वाटते त्यातले हे सत्य उदाहरन म्हणजे आमच्या प्रिय दीदी लोकांना सूर्याच्या किरणांचे दर्शन घडवून वाट दाखविण्याचे कार्य त्या उत्साहाने, जोमाने करतात त्यांच्यात असलेली समाधानी वृत्ती, अथक परिश्रम, निष्ठा, दृढ विश्वास या सर्व गोष्टी यामुळे त्या सर्वांची मने जिंकतात यातूनच त्यांनी आपले प्रभावी व्यक्तिमत्व निर्माण केले आहे. अश्या या आमच्या आदरणीय दीदी आहेत.
सूर्याच्या किरणाचा प्रकाश जसा आशेची लाट पसरवितो तसे दिदींचे आमच्या जीवनातील स्थान आहे.
चालण्या – बोलण्यातला स्पष्टपणा, व कार्य करून दाखविण्यातला कर्तुत्वपणा असे खंबीर व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या दीदी
विचारांची प्रगल्भता, व मनाचा मोठेपणा, वक्तशीर आणि काटेकोर असे वर्चस्व या गोष्टींमुळे त्यांचे स्थान उंचावते. त्यांनी मांडलेल्या मुद्देसूद विचारांनी समोरच्या व्यक्तीवर पडलेली छाप या गुणांचा अभिमान वाटतो जेवढी प्रेमळ तेवढीच स्वभावाने एकदम शांत अशी ही माझी लाडकी दीदी. माझे प्रेरणास्थान, माझी सर्वेसर्वा.
त्यांना आयुष्यात खूप लोकांनी मागे खेचण्याचा प्रयत्न केला, पण त्या नेहमी सकारात्मक राहिल्या आणि स्वत: वर असलेल्या विश्वासाने त्यांनी सर्वांची मने जिंकली आणि एक पाठोपाठ एक स्वप्न साकार करत गेल्या.
तुझ्या आशा – आकांक्षा, विचार असेच उंच उंच भरारी घेऊ दे मनात माझ्या एकच इच्छा तुला उदंड आयुष्य लाभू दे.
- सौ. सविता प्रदीप माने
कोशाध्यक्ष्या, सरस्वती शिक्षण संस्था
No comments