गॅलेक्सी सोसायटीला दुसऱ्याच वर्षी जिल्हा कार्यक्षेत्र प्रदान ; 2 नवीन शाखा सुरू करण्यासही परवानगी
Provide district jurisdiction to Galaxy Co-op. Credit Society
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण - गॅलेक्सी को-ऑप. क्रेडिट सोसायटीला दुसऱ्याच वर्षी जिल्हा कार्यक्षेत्र मिळाले असून दोन नवीन शाखा सुरु करण्यासही परवानगी मिळाली आहे. गॅलेक्सी सोसायटीचे चेअरमन व के. बी. उद्योग समुहाचे संचालक सचिन यादव यांनी इतरत्र शाखा विस्तार करण्याआधी फलटण तालुक्यातील शेतकरी सहकाराच्या प्रवाहात राहिला पाहिजे, त्याचबरोबर त्याला बँकेच्या सर्व सोयी मिळायला हव्यात या उद्देशाने संपूर्ण ऑनलाईन प्रणाली व मोफत आर. टी. जी. एस. इत्यादी सेवेने परिपूर्ण दोन शाखा फलटण तालुक्यातील साखरवाडी व राजाळे येथे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
या शाखांच्या माध्यमातून राजाळे व साखरवाडी सह पंचक्रोशीतील सर्व लोकांना किफायतीशीर व कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय अनेक बँकिंग सेवा मिळणार आहेत. गॅलेक्सी को-ऑप. क्रेडिट सोसायटीने जिल्हा मान्यता असलेल्या सातारा जिल्हा महिला विकास सहकारी पत पुरवठा या संस्थेचे विलीनीकरण गॅलेक्सी मध्ये करवून घेऊन त्यांच्या सभासदांना देखील सहकाराच्या प्रवाहात आणले आहे. त्यामुळे गॅलेक्सी सोसायटीला जिल्हा कार्यक्षेत्र मिळणे सोपे झाले आहे.
ग्रामीण भागात आज ही रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी फी आकारली जाते हे योग्य नसल्याचे सांगून बँकिंग सेवा हा मुलभूत अधिकार असल्याचे सचिन यादव यांनी सांगितले. या नवीन दोन्ही शाखांना जनसंपर्क अधिकारी वगैरे सेवा, सुविधा असणार असून सेवा देण्यात फलटण येथील मुख्य कार्यालया इतकेच तत्पर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गॅलेक्सी को ऑप क्रेडिट सोसायटीने सर्वांच्या सहकार्याने दोन वर्षाच्या अल्प कालावधीमध्ये चांगली वाटचाल केली आहे. ग्राहकांना व के. बी. उद्योग समुहातील प्रत्येक घटकास उत्तम सेवा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला आहे, तसेच थोड्याच दिवसांमध्ये बँकेकडून आणखी अत्याधुनिक सेवा सुविधा सुरु करीत असल्याचे यावेळी सचिन यादव यांनी निदर्शनास आणून दिले.
संस्थेने दोन वर्षात सुमारे दहा कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला असून १०० कोटींची आर्थिक उलाढाल केली असल्याचे सांगून गॅलेक्सी को-ऑप. सोसायटी नेहमीच ग्राहक हित प्रथम या ब्रीद वाक्यावर काम करेल यांची ग्वाही देत, साखरवाडी शाखेचे उदघाटन दि. २ एप्रिल रोजी होणार असून सभासदांनी शाखेतील सर्व सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन चेअरमन सचिन यादव यांनी केले आहे.
No comments