Breaking News

वीजबिल माफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सुरवडी येथे रास्तारोको

रास्तो रोको प्रसंगी धनंजय महामूलकर, नितिन यादव, सचिन खानविलकर व अन्य

Rastaroko at Survadi of Swabhimani Shetkari Sanghatana for electricity bill waiver

        फलटण -   लॉकडाऊन कालावधीमधील विज बिल माफ करावे, घरगूती व कृषि पंपांची विज तोडू नये या मागणीसाठी आज सुरवडी ता. फलटण येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने  रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

सुरवडी येथे ठप्प झालेली वाहतूक

      स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामूलकर व तालुकाध्यक्ष नितिन यादव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या रास्ता रोको आंदोलनामध्ये फलटण पुणे मार्गावर सुरवडी ता. फलटण येथे हा मार्ग रोखून धरण्यात आला. या वेळी शासनाच्यावतीने सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्याची होत असलेल्या पिळवणूकीचा निषेध करण्यात आला व शासनाचे धोरण व महावितरणचा कारभार या विरुध्द घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. लॉकडाऊन कालावधीमधील विज बिल माफ करावे, घरगूती व कृषि पंपांची विज तोडू नये अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना गेले वर्षभर सातत्यपुर्वक करित आहे परंतू निर्णय घेण्या ऐवजी शासन या प्रश्नी झोपेचे सोंग घेत आहे अशी टिका यावेळी धनंजय महामूलकर यांनी केली उर्जामंत्री व महावितरणच्या कारभाराचा निषेध करुन जर या प्रश्नी दुर्लक्ष कराल तर राज्यभर तिव्र पडसाद उमटतील असा इशाराही महामूलकर यांनी यावेळी दिला. आंदोलनात डॉ. रवींद्र घाडगे, सचिन खानविलकर, प्रमोद गाडे, दादा जाधव, सुभाष जाधव, बाळासाहेब शिपकुले, रोहन मोहिते, सचिन बारगळे, विक्रम धायगुडे, रोहन चव्हाण, अजित जाधव, उमेश घाडगे, परेश बोडरे, अक्षय लोंढे, निखिल नाळे, प्रल्हाद अहिवळे, मधुकर गाढवे, विश्वनाथ यादव आदीं कार्यकर्ते सहभागी झाले होते.

No comments